Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रेम व्यक्त करण्याचा हायटेक फंडा

प्रेम व्यक्त करण्याचा हायटेक फंडा

वेबदुनिया

प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आमचे सेम असते, असेच काहीचे चित्र व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती बदलेल्या असल्या तरी प्रेम कायम आहे. आधुनिक युगात काळात प्रेम व्यक्त करण्याचे नवनवीन फंडे तरुणांनी शोधून काढले आहे.

प्रेम व्यक्त करण्यासाठी गेल्या दशक भरात प्रेमपत्रांनी आपले स्तान टिकवून ठेवले होते. मात्र हे पत्र भलत्याच्या हाती लागल्यावर पडणारा मार बर्‍याच तरुणांना त्याकाळी बसलाच असणार!

रंगबेरंगी फुलं, चॉकलेट, आकर्षक भेटवस्तू या तरुणांना बर्‍याच भावल्या. त्यांनी तरुणाईच्या गुलाबी क्षणांवर बरेच वर्ष अधिराज्य गाजवले. पिवळ्या रंगाचे फुल म्हणजे मैत्री, पांढरे म्हणजे फक्त ओळख तर लाल म्हणजे प्रेम असे संकेतही त्यातून निर्माण झाले. त्यानंतर कुछ मिठा हो जाएचा जमाना आला, आणि प्रेम व्यक्त करतांना चॉकलेट देणेदेखल प्रथाच झाली.

गेल्या एक दोन वर्षांत तर तरुणाई आणि मोबाईल असं समीकरणच झाले आहे. त्यामुळे एसएमएस आणि फोनने तर प्रेम व्यक्त करण्यात क्रांतीच घडवली असे म्हणावे लागेल.

त्यानंतर ऑर्कुट आणि फेसबुकमुळे ऑनलाईन प्रेम व्यक्त करण्याचा नवा फंडाही तरुणांनी आजमावला आहे. नोकरीमुळे फेसबुकवरच ऑनलाईन आणि स्क्रॅब पाठवून ते आपला व्हॅलेंटाईन दिवस साजरा करणार आहे. एकूणच काय तर प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती बदलेल्या असल्या तरी प्रेम मात्र सारखेच असल्याचे चित्र आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi