Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हॅलेंटाईनच्या बाबतीत स्त्रियांपेक्षा पुरुष अधिक रोमँटिक

व्हॅलेंटाईनच्या बाबतीत स्त्रियांपेक्षा पुरुष अधिक रोमँटिक

वेबदुनिया

मादीला आकर्षित करण्यासाठीनर अनेक करामती करून दाखवू शकतो, हा निसर्गाचा नियमच आहे. मोराचा फुललेला पिसारा असो किंवा सुगरण पक्ष्याने बांधलेले सुबक घरटे असो, सगळ्या खटपटी नरच करतात, मादी नुसते 'अवलोकन' करते! मनुष्यप्राण्याबाबतही फारसे वेगळे नाही. 'व्हॅलेंटाईन डे' बाबतही स्त्रियांपेक्षा पुरुषच अधिक तयारी करती असतात, असे ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका पाहणीत आढळले आहे.

अशा 'डे' वेळी आपल्या जोडीदाराला किंवा भावी जोडीदाराला खूश करण्यासाठी पुरुष मंडळी उत्सुक असतात. तुलनेने स्त्रिया मात्र त्याकडे दुर्लक्ष करतात. महिला अशावेळी जास्तीत जास्त एखादे व्हॅलेंटाईन कार्ड देऊन बोळवण करू शकतात, पण पुरुष मात्र अत्यंत विचारपूर्वक सुंदर गिफ्तट देण्याचा प्रयत्नात असतात. स्त्रिया अशावेळी आपल्या भावनांचे अधिक प्रदर्शन करीत नाहीत, पुरुषांचा मात्र भावनेचा धबधबा ओसंडून वाहत असतो. ब्रिटनमध्ये दोन हजार स्त्री-पुरुषांची याबाबत पाहणी करण्यता आली. त्यात असे दिसनू आले की, 21.5 टक्के महिलांचा 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्याचा कोणताही प्लॅन नसतो. पुरुषांमध्ये ही संख्या अवधी 14.5 टक्के आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi