Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हेलेंटाईनला प्रसन्न करण्यासाठी एस्ट्रो टिप्स

व्हेलेंटाईनला प्रसन्न करण्यासाठी एस्ट्रो टिप्स

वेबदुनिया

'व्हेलेंटाईन डे' हा दिवस संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा पूर्ण आठवडा तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रसन्न करण्यात लागले असतात. 14 फेब्रुवारीचा दिवस हा विशेष असतो. मग आता तुमच्या राशीनुसार तुम्हाला तुमच्या व्हेलेंटाईनला काय भेट द्यायला पाहिजे हे जाणून घ्या :-

मेष : मेष राशीच्या जातकाने आपले जोडीदार किंवा प्रियकर/प्रेयसीला लाल गुलाब भेट म्हणून द्यायला पाहिजे. सिनरी (फोटो) उपहारम्हणून द्या. तसेच त्याला गणपतीचे दर्शन करण्यासाठी घेऊन जायला पाहिजे, त्याने तुमच्या संबंधात सदैव प्रसन्नता राहील.

वृषभ : वृषभ राशीच्या जातकांनी आपले जोडीदार किंवा प्रेयसी/प्रियकराला खूश करण्यासाठी पांढरा गुलाब भेट म्हणून द्यावे. आपल्या जोडीदारासोबत दुर्गा देवीच्या मंदिरात जाऊन देवीला जासवंताचे फूल वाहावे. तुमचा जोडीदार नक्कीच प्रसन्न होईल.

मिथुन : मिथुन राशीच्या जातकाने आपल्या जोडीदाराला प्रसन्न करण्यासाठी हिरवी वस्तू भेट म्हणून द्यावी. एखाद्या हिरव्यागार बगीचेचा फोटा द्या. व्हेलेंटाईन बरोबर महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी जायला पाहिजे.

कर्क : कर्क राशीच्या लोकांनी आपल्या साथीदाराला प्रसन्न करण्यासाठी पांढरा गुलाब द्यावा. गिफ्ट्म्हणून कुबेराचा फोटो द्यावा. तसेच आपल्या जोडीदाराला लक्ष्मी- नारायणाच्या मंदिरात घेऊन जायला पाहिजे. जर नात्यात काही अडचणी निर्माण झाल्या असल्यास तर त्या नक्कीच दूर होतील.

सिंह : सिंह राशीच्या जातकांनी आपल्या जोडीदाराला प्रसन्न करण्यासाठी गरम कपडे भेट म्हणून द्यावे. सूर्योदयाचे चित्र द्या. तसेच विष्णूच्या दर्शनास जावे.

कन्या : कन्या राशीच्या जातकाने आपल्या जोडीदाराला हिरव्या वस्त्र भेट करावे. वाहत्या पाण्याचे फोटो द्यावे. त्याच बरोबर राधा-कृष्णाचे दर्शनास जावे. तुमच्या दोघांच्या जीवनात जन्मभर आनंद राहील.

तूळ : तूळ राशीच्या लोकांनी आपल्या साथीदाराला पांढरे फुल भेट म्हणून द्यायला पाहिजे. देवीचे फोटो भेट म्हणून द्यावे. तसेच शिव परिवाराचे दर्शन करावे.

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांनी आपल्या साथीदाराला लाल लोकरीचे वस्त्र भेट म्हणून द्यावे. आकाशाची फोटो द्यावी ज्यात सूर्यासोबत तारे देखील असावे. रिद्धी-सिद्धी सहित गणपतीचे दर्शन करावे.

धनू : धनू राशीच्या लोकांनी आपल्या साथीदाराला पिवळा गुलाब भेट म्हणून द्यावा. एखाद्या महापुरुषाचा फोटो उपहार म्हणून द्यायला पाहिजे. त्याच बरोबर साईबाबा किंवा दत्त महाराजांचे दर्शन करण्यास जावे.

मकर : मकर राशीच्या लोकांनी आपल्या जोडीदाराला पायाची साखळी भेट म्हणून द्यावी. तसेच राम- सीतेच्या दर्शनास जावे.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या जोडीदाराला रुद्राक्ष भेट म्हणून द्यावे. गाय-वासरूचे चित्र ज्यात श्रीकृष्णही असेल तो फोटो भेट करावा व मारुतीच्या दर्शनास जावे.

मीन : मीन राशीच्या जातकांनी आपल्या साथीदाराला निळे वस्त्र भेट म्हणून द्यावे. वाहत्या नदीचा फोटो द्यावा. तसेच गुरूच्या दर्शनास जावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हॅलेंटाईन डेची तयारी