Publish Date: Thu, 09 Feb 2023 (19:41 IST)
Updated Date: Thu, 09 Feb 2023 (23:43 IST)
अबाल वृद्ध, साऱ्यांनाच ते आवडे,
न आवडलं तरच वाटे मज नवाडे,
काय जादू आहे माहिती नाही ह्यात,
सर्वच विरघळतात त्याच्या स्वादात,
काय काय नवीन पदार्थ बनवितात चॉकलेट पासून,
ज्यात हे मिसळत, ते आवडतं सर्वांना मनातून,
खुश कुणाला करायचं असेल जर,
चॉकलेट देऊन खुश करण्यावरच असतो भर,
तर यावं आपण ही या चॉकलेटी दुनियेत,
मनमुराद आनंद घ्यावा, हीच जादू ह्यात!
..अश्विनी थत्ते.