Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Valentine Day 2024: वेलेंटाइन डे दिवशी या भेटवस्तू देउ नये

Valentine Day 2024: वेलेंटाइन डे दिवशी या भेटवस्तू देउ नये
, बुधवार, 31 जानेवारी 2024 (16:08 IST)
दरवर्षी 14 फेब्रुवरीला वेलेंटाइन डे साजरा केला जातो. हा दिवस प्रेम करणाऱ्यांसाठी खूप खास असतो. या दिवशी काही जण एकमेकांसमोर मनातील प्रेम व्यक्त करतात.प्रेमी जोडपे या दिवसाची आतुरतेने वाट बघतात आणि या खास दिवसाची आठवण राहावी म्हणून काही तरी खास करू इच्छितात. तसेच काही लोक आपल्या पार्टनरला  वेलेंटाइन डे दिवशी भेटवस्तू देतात. पण अनेकदा  लोक अशी भेटवस्तूची निवड करतात की जी वस्तू वास्तुशास्त्र सोबत तसेच ज्योतिषशास्त्रात पण शुभ मानली जात नाही अशा भेटवस्तू नात्यांत दुरावा आणतात. म्हणून अश्या भेटवस्तू तुम्ही तुमच्या पार्टनरला देउ  नका. 
 
काळ्या रंगाचे कपडे-  हिंदू धर्मात काळ्या रंगाला अशुभ मानले आहे. यासाठी कधीही कोणालाही  काळ्या रंगाचे कपडे भेटवस्तू म्हणून देउ नये.जर तुम्हाला कोणी या रंगाचे कपडे किंवा वस्तू भेटवस्तू म्हणून दिली तर तुम्हाला जीवनात समस्या निर्माण होउ शकतात. 
 
घड्याळ- नेहमी लोक भेटवस्तू मध्ये घड्याळ देणे हा एक पर्याय निवडतात. पण वास्तुशास्त्रनुसार घड्याळ भेटवस्तू म्हणून देणे चांगले नसते. हे दिल्याने  व्यक्तीच्या जीवनातील प्रगती थांबून जाते. 
 
रूमाल आणि पेन- वास्तुशास्त्रानुसार  कधीपण रुमाल आणि पेन भेटवस्तू म्हणून देउ  नये जर तुम्ही तुमच्या कामासंबंधित वस्तू भेटवस्तू म्हणून देत असाल तर तुमच्या व्यवसायात नुकसान संभवतो. तसेच नात्यात दुरावा येउ शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हळदीमधली भेसळ कशी ओळखता येते? जाणून घ्या