Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Rose Day पासून वेलेंटाइन डे ची सुरवात का होते?

Roses
, बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 (08:00 IST)
गुलाबाच्या फुलाच्या रंगाचा वेगवेगळा अर्थ असतो. जाणून घ्या कोणाला लाल गुलाब द्यावा गुलाबाचे फुल म्हणजे प्रेमाचे प्रतिक.
 
Rose Day 2024 फेब्रुवारी महिना खूप खास असतो. कारण या महिन्यात वेलेंटाइन डे वीक साजरा केला जातो. कपल्ससाठी हा वीक खास असतो. ज्यांना प्रेम व्यक्त करायचे असते त्यांच्यासाठी वेलंटाइन डे ही एक संधी असते. 7 फेब्रुवारी पासून वेलेंटाइन डे वीक सुरु होतो आणि 14 फेब्रुवारीला वेलेंटाइन डे साजरा केला जातो. 
 
या वीकची सुरवात रोज डे म्हणजे गुलाबाचे फुल देऊन सुरु होते. जोडीदाराला फुल देणे हा प्रेमळ क्षण असतो. फुल  हे मुलींना जास्त प्रमाणात आवडतात. प्रत्येक फुलाचा अर्थ वेगळा असतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की वेलेंटाइन डे वीकची सुरुवात गुलाबाच्या फुलापासून का होते? चला जाणून घेऊया कारण 
 
गुलाबचे फुल हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते. हे फुल देऊन मनातील प्रेम व्यक्त करणे ही पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे. भारतात तसेच वेस्टर्न देशात पण मनातील प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांचे आदान-प्रदान केले जाते. गुलाबाच्या फुलाच्या माध्यमातून तुम्ही न बोलता प्रेमाची भावना व्यक्त करू शकतात. कारण हे फुल खुप खास असते आणि हे खास लोकांना दिले जाते. 
 
गुलाबाचे फुल रंगाचा वेगवेगळा अर्थ 
1. लाल गुलाब- लाल गुलाबाला प्रेमाचे प्रतिक मानले जाते. जर तुम्ही कोणावर खूप प्रेम करत आहात आणि शब्दात सांगायला जमत नसेल तर लाल गुलाब देऊन आपल्या भावना व्यक्त करू शकतात. वेलेंटाइन वीक मध्ये गुलाब दिल्यावर समोरील व्यक्ति तुमच्या मनातील ओळखून घेईल.
 
2. पिवळा गुलाब- पिवळा गुलाब मैत्रीचे प्रतिक मानले जाते. हा गुलाब देऊन तुम्ही तुमच्या मित्राजवळ आपली पक्की मैत्री असल्याच्या भावना व्यक्त करू शकतात आणि खास असल्याची जाणीव करून देऊ शकतात. पिवळा गुलाब म्हणजे नवी सुरवात हे प्रतिक मानले जाते. 
 
3. गुलाबी गुलाब- गुलाबी गुलाब हा दिसायला खूप सुंदर आणि कोमल असतो गुलाब त्यांनाच दिला जातो जे तुम्हाला आवडतात. रोज डे च्या दिवशी तुम्ही गुलाबी गुलाब पण तुमच्यासाठी खास असलेल्या व्यक्तीला देऊ शकतात. 
 
4. नारंगी गुलाब- नारंगी गुलाब हा प्रेमाच्या भावनेचे प्रतिक असते. नारंगी गुलाब देऊन तुम्ही तुमच्या मनातील प्रेमाच्या भावना व्यक्त करू शकतात. 
 
5. पांढरा गुलाब- पांढरा गुलाब हा शांतीचे प्रतिक असतो या रंगाचे गुलाब देऊन तुम्ही नात्यात निर्माण झालेला दुरावा, गैरसमज मिटवून पुढे जाण्याची प्रेरणा देऊ शकतात. जर तुमचा जोडीदार तुमच्या वर नाराज असेल तर त्यांना पांढरा गुलाब दया. मग नंतर इतर रंगाचे गुलाब दया.  

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rose Day 2024 Wishes Marathi रोझ डे च्या रोमँटिक शुभेच्छा