Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पकंजा पालवे यांच्या धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

पकंजा पालवे यांच्या धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल
, शनिवार, 27 सप्टेंबर 2014 (09:35 IST)
परळी- भाजपच्या आमदार पंकजा पालवे- मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत पाचपेक्षा अधिक कार्यकर्ते नेल्याचा ठपका दोघांवर ठेवण्यात आला आहे.
 
परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून आमदार पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करत असताना उमेदवारांनी त्यांच्याबरोबर केवळ चार जणांनाच बरोबर न्यावे, अशा निवडणूक अधिकार्यांदच्या सूचना आहेत.
 
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्यासमवेत पाचपेक्षा अधिक कार्यकर्त्यांना कक्षात नेले, तर धनंजय मुंडे यांच्याबरोबरही पाचपेक्षा अधिक कार्यकर्ते होते. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याने तहसीलदार अतुल जटाळे यांनी परळी शहर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi