राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली. सुप्रिया सुळे अमरावती येथील सभेत बोलत होत्या. भाजपकडे एकही लायक नेता नसल्याने त्यांच्यावर ही वेळ आल्याचेही सुप्रिया सुळे म्हटल्या. भाजपला प्रचारासाठी केंद्रातून नेते बोलवावे लागले, याचा अर्थ असा की भाजपकडे एकही लायक नेता नाही. परंतु भाजपसारखी अवस्था राष्ट्रवादीची नाही. राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात संघटकांची फौज आहे. प्रत्येक नेता अख्या महाराष्ट्रात फिरून सभा घेत आहेत.
गोपीनाथ मुंडे साहेब असते तर, मला महाराष्ट्र दौरा करावाच लागला नसता असे नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते. त्यामुळे आता महाराष्ट्रात भाजपकडे त्या लायकीचा नेताच शिल्लक राहिला नाही का? असा प्रति प्रश्न यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
शरद पवार तसेच राष्ट्रवादीवर कोणतीही टीका सहन केली जाणार नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्राच्या अस्मितेला जर ठेस पोहचत असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारचे आव्हान केले.
शरद पवारांमुळे महिलांना आरक्षण मिळाले. मराठवाडा विद्यापिठाला नाव दिले गेले. मात्र, शिवसेना आणि भाजपाने याला विरोध केला हे सुद्धा सांगायला सुप्रिया विसरल्या नाहीत.