Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र हा धृतराष्ट्र नाही

महाराष्ट्र हा धृतराष्ट्र नाही
, मंगळवार, 7 ऑक्टोबर 2014 (13:00 IST)
जम्मू-काश्मिरातील पूरग्रस्तांसाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला परंतु महाराष्ट्रामधील शेतकर्‍यांना त्या मानाने अत्यल्प मदत देऊन महाराष्ट्राबद्दल आपला दुजाभाव मोदी सरकारने दाखवून दिला असल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये बोलताना केली आहे. गेली पंचवीस वर्षे अस्तित्वात असलेली शिवसेना व भाजप यांची युती तोडण्याचे पाप भाजच्या नेत्यांनी केले आहे. त्याला स्वत: मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे सर्वस्वी कारणीभूत असल्याची टीका त्यांनी केली आहे. राज्यातील आणि विशेषत: विदर्भातील शेतकर्‍यांना कर्जमुक्ती मुळीच नको आहे. केंद्र सरकारने सवलतीच्या दराने आपल्याला कर्ज द्यावे, अशी तेथील शेतकरी मागणी करीत असताना मोदी सरकार मात्र धृतराष्ट्रासारखे आंधळेपणा दाखवित आहे. पण हा महाराष्ट्र आहे, धृतराष्ट्र नाही हे मोदी यांनी लक्षात ठेवावे, असा गंभीर इशारा उध्दव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप नेत्यांना उद्देशून दिला आहे. हिंदुत्वाच मुद्यावर शिवसेना नेहमी भाजपला बरोबरीची व सन्मानाची वागणूक देत आला आहे. परंतु त्याचा वेगळा अर्थ काढून भाजपने शिवसेनेबरोबर निष्कारण आगळीक काढली आणि युती तोडली. त्याचे पाप सर्वस्वी भाजप नेतृत्वावर असल्याची घणाघाती टीका ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी जागावाटपाची बोलणी करण्यासाठी शिवसेना व भाजपचे नेते मुंबईमध्ये एकत्र जमले होते तेव्हा भाजपने आपल्या ताकदीपेक्षा जास्त जागा मागितल्या, पण त्या अवास्तव होत. जास्त जागांच हट्टापी भाजप नेत्यांनीच युती तोडून महाराष्ट्राच्या जनतेचा घोर विश्वासघात केला असल्याची घणाघाती टीका ठाकरे यांनी केली आहे. शतप्रतिशत भाजप म्हणजे आपल्या बळावर भाजप यावेळी राज्यात आपल्या पक्षाचे सरकार निवडून आणण्याची भाषा करीत आहे. परंतु महाराष्ट्राची जनता भाजप नेत्यांचे हे स्वप्न कदापि साकार होऊ देणार नाही, असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री पदासाठी भाजपमध्ये अनेक दावेदार आहेत. भाजपच महाराष्ट्र शाखेचे नेते ‘दिल्लीत नरेंद्र, तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र’ अशा घोषणा देत आहेत. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होण्याला पात्र असल्याची घोषणा त्यांचे अनुी देत आहेत. परंतु विसर्जित महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळण्याची आपली इच्छा असल्याचे वेळोवेळी प्रकट केले आहे. भाजप नेत्यांची सत्तेची ही हाव राज्यातील जनतेला उबग आणि शिसारी आणणारी असल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी केली आहे.
 
भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रात सत्ता मिळविली आहे. महाराष्ट्रामधील लोकसभेच्या 48 पैकी 42 जागा भाजप-शिवसेना युतीला प्रचंड मतांनी मिळवून देण्यामध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये होणार्‍या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्या प्रमाणात आपपल्या जास्त जागा मिळावत अशी न्याय मागणी शिवसेनेने केली होती. परंतु भाजपच नेत्यांनी ती हट्टाला पेटून फेटाळली आणि स्वत:च पावर धोंडा पाडून घेतला आहे. अशा लोकांना महाराष्ट्राची जनता कदापि माफ करणार नाही, असा गंभीर इशारा उध्दव ठाकरे यांनी दिला आहे. अच्छे दिन आनेवाले है असे आश्वासन देत शिवसेनेच्या मदतीने भाजपने केंद्रामध्ये सत्ता मिळविली पण महागाई वाढतच चालली आहे आणि अच्छे दिनऐवजी बुरे दिन देशाच्या नशिबी येण्याला भाजपचे केंद्रातील सरकार संपूर्णपणे जबाबदार असल्याची टीका ठाकरे यांनी केली आहे. पंतप्रधान होऊनदेखील मोदी यांनी महाराष्ट्राला फारसे काही दिलेले नाही. त्यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत सातत्याने दुजाभाव दाखविण्याचे धोरण चालू ठेवले आहे. अलीकडेच मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मुंबईमधील काही सरकारी कचेर्‍या अहमदाबादला हलविण्याचा घाट घातला आहे. तसेच मुंबईमधील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची शाखादेखील नवी दिल्लीला हलविण्याचे कारस्थान अमलात आणले आहे. त्याचा जाब या महिन्यामध्ये होणार्‍या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत राज्याची जनता भाजपला विचारलशिवाय मुळीच स्वस्थ बसणार नाही, असे ठाकरे यांनी निदर्शनाला आणले आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी भाजपजवळ अनेक सक्षम नेते असताना राज्भरामध्ये पुन्हा मोदी यांचा चेहराच वारंवार दाखविला जातो, हे अत्यंत निंदनीय असल्याचे ठाकरे यांनी सांगितले आहे. भाजप स्वत:च्या बळावर राज्यात सत्ता मिळवू शकतो, असे त्या पक्षाचे नेते सांगत असतात. मात्र मोदी यांच्या एवढय़ा जाहीरसभा महाराष्ट्रामध्ये कशासाठी घेण्यात येत आहेत, असा बोचरा सवाल ठाकरे यांनी केला आहे. मोदी हे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोन डझन सभा घेणार आहेत. यावरून भाजपच्या पायाखालील वाळू सरकू लागली असल्याचे हे लक्षण असल्याचे ठाकरे यांचे मत आहे. नुकतेच मुंबई, औरंगाबाद व बीड येथील जाहीर भाषणांमधून मोदी यांनी भाजपची कामगिरी सांगितली आहे. पण शिवसेनेचा उल्लेख करण्याचे त्यांनी कटाक्षाने टाळल्याचे दिसून येते. हे मैत्रीचे कसले लक्षण? असा संतप्त सवाल ठाकरे यांनी केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने मोदींसाठी मते मागितली. मात्र आता मोदी हे महाराष्ट्रात शिवसेनेसाठी नव्हे, तर भाजपसाठी मदत मागत आहेत, हे अत्यंत खेदजनक असल्याची टीका ठाकरे यांनी केली आहे. केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर भाजपला आता हिंदुत्व नकोसे झालचे दिसून येत आहे. भाजप हा विश्वासघातकी मित्र असून महाराष्ट्रातील जनता या निवडणुकीमध्ये भाजपवर मुळीच विश्वास ठेवणार नाही, असे ठाकरे यांनी निक्षून बजावले आहे.
 
लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेवर स्तुतिसुमने उधळणारे मोदी हे आता शिवसैनिकांवर ऊठसूठ टीका करीत आहेत. हे मैत्रीचे लक्षण नव्हे, त्याचा पश्चात्ताप त्यांना नक्कीच होईल. शिवसेनेला दुखावून आपण मोठी घोडचूक करीत आहोत हे मोदी यांना समजून येईल. ते भाजपच्या दृष्टीने हिताचे ठरणार आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपबरोबर युती केली. शिवसेनेचे हिंदुत्व शंभर नंबरी सोने असल्याचे बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवून दिले होते. अयोध्यातील बाबरी मशीद कारसेवक
आपली सेवा बजावत असताना आपोआप पडली व भुईसपाट झाली तेव्हा त्यावेळच्या भाजप नेत्यांनी त्याबद्दल आपली जबाबदारी झटकून टाकली आणि भाजपचे कार्यकर्ते असले काम कधीही करणार नाहीत, असे सांगितले होते. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडणारे शिवसैनिक असतील तर त्याचा आपल्याला जरूर अभिमान असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. बाळासाहेबांना ढोंगीपणा मुळीच सहन होत नव्हता. त्यासाठी ते नेहमी हिंदुत्वाला विरोध करणार्‍यांवर तुटून पडत असत. बाबरी मशीद पडल्यानंतर देशामध्ये व विशेषत: मुंबईमध्ये उसळलेल्या भीषण जाती दंगलीच्यावेळी अल्पसंखकांच्या हल्लपासून हिंदूंचा बचाव करण्यासाठी शिवसेना व शिवसैनिक जिवावर उदार होऊन पुढे आले. त्यामुळे मुंबईमधील लाखो हिंदू सुरक्षित राहिले, याची आठवण उध्दव ठाकरे यांनी भाजपवाल्यांना करून दिली आहे. त्यावेळचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व ज्येष्ठ भाजप नेते कल्याणसिंह, राज्यातील भाजप नेते कलराज मिश्र आणि ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी कानावर हात ठेवले होते. त्यावेळी त्यांना हिंदुत्वाऐवजी धर्मनिरपेक्षतेचा पुळका आला होता, हे दुर्दैवी असल्याचे त्यावेळी दिसून आल्याची टीका ठाकरे यांनी केली आहे. शहा व मोदी यांच्या इशार्‍यावरून भाजपने शिवसेनेबरोबरची गेली पंचवीस वर्षे अस्तित्वात असलेली मैत्री तोडावी हे अत्यंत खेदजनक आहे. युती तुटल्याने मुंबई, ठाणे व अन्य काही महत्त्वाच्या मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची दाट शक्यता या महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिसून येत आहे. त्यामुळे आता मुंबई शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या भाजपच्या भित्तीपत्रकांमधून शहा यांची छायाचित्रे झळकत आहेत. शहा हे आपल्या मतदारसंघात
प्रचारासाठी आले तर आपल्याला मराठी माणसांची मते मिळणार नाहीत या भीतीपोटी भाजपचे उमेदवार शहा यांच्या जाहीर सभा आपल्या मतदारसंघामध्ये नको, अशी मागणी करीत आहेत. हे शहा व भाजप यांची महाराष्ट्रामधील लोकप्रियता घटत चालल्याचे ठळक लक्षण असल्याची टीका ठाकरे यांनी केली आहे. 

रमेश महामुनी

Share this Story:

Follow Webdunia marathi