Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंडे नाव जगाला विसरू देणार नाही- पंकजा मुंडे

मुंडे नाव जगाला विसरू देणार नाही- पंकजा मुंडे
पाथर्डी , शनिवार, 4 ऑक्टोबर 2014 (10:47 IST)
माझी लढाई कोणत्या पक्षाशी नसून थातूरमातूर नेत्याशीं तर मुळीच नाही. सत्तेचा कळस कुणीही व्हा, परंतु पायाचा दगड मी राहणार आहे. मात्र, मुंडे हे नाव जगाला विसरू देणार नाही, असे भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा पालवे- मुंडे यांनी सांगितले. पंकजा भगवानगडावर आयोजित सभेत बोलत होत्या. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते.

गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडवरून संघटनाचे कार्य केले. आमदार पंकजा मुंडे यांचे नेतृत्व मजबूत करण्यासाठी ओबीसींची ताकद त्यांच्या मागे उभी करण्यासाठी भगवानगडाला ओबीसींचे ऊर्जाकेंद्र बनवा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी केले.

या वेळी व्यासपीठावर गुजरातचे मंत्री शंकरभाई चौधरी, खासदार दिलीप गांधी, एकनाथ खडसे, भगवानगडाचे सचिव गोविंद घोळवे, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर, आमदार शिवाजी कर्डिले, राम शिंदे, विनायक मेटे, बीड लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार डॉ. प्रीतम खाडे, शेवगाव मतदारसंघातील उमेदवार मोनिका राजळे, पंकजा यांचे पती अमित पालवे आदी उपस्थित होते. गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री अध्यक्षस्थानी होते. 

दरम्यान, भगवानगडावर मुंडे यांच्या पुढाकाराने सुरू झालेला दसरा मेळावा या वर्षी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडला. यावेळी गोपीनाथ मुंडे यांचे शेवटच्या भाषणाची ध्वनिफित ऐकवण्यात आली. अनेक कार्यकर्त्यांच्या भावनांचाही बांध यावेळी फुटला. शेकडो कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करीत पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित करा, अशी मागणी केली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi