पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खोटे बोलून लोकसभा ताब्यात घेतली. ते महाराष्ट्रावर सूड उगवत असून, राज्यापासून मुंबई तोडण्याची भाषा करीत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली.
करमाड येथे फुलंब्री मतदारसंघाचे उमेदवार डॉ. कल्याण काळे व पैठणचे उमोदवार रवींद्र काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. राणे म्हणाले, की पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आता कमी झाली आहे. पाकिस्तानने तीन महिन्यांत पन्नास गोळीबार केला, तरी केंद्र सरकार काहीही करू शकत नाही. राज्यात मराठी अस्मितेला धक्का पोहोचविणार्या गद्दारांना धडा शिकवा.