Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरे आज घेणार मनसे उमेदवारांच्या मुलाखती

राज ठाकरे आज घेणार मनसे उमेदवारांच्या मुलाखती
औरंगाबाद , सोमवार, 15 सप्टेंबर 2014 (11:16 IST)
मनसे प्रमुख राज ठाकरे रविवारी दुपारी औरंगाबादेत दाखल झाले. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.

जालना रोडवरील सागर लॉन येथे सोमवारी सकाळपासूनच राज ठाकरे मराठवाड्यातील इच्छुकांच्या ते मुलाखती घेणार आहेत. या भागातील 46 जागांसाठी तब्बल दोनशे उमेदवार उत्सुक आहेत.  सहा महिन्यांनंतर राज ठाकरे मराठवाड्याच्या दौर्यारवर आले आहेत. राज ठाकरेंसोबत आमदार मंगेश सांगळे, बाळा नांदगावकर, सचिव अविनाश अभ्यंकर हे मुलाखती घेतील.

दरम्यान, मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मोदी लाटेचा फायदा या निवडणुकीतही महायुतीच्या उमेदवारांना होईल, अशी आघाडीच्या नेत्यांना धास्ती वाटत आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या मतांचे विभाजन करण्यासाठी मनसेला मराठवाड्यात दोन्ही काँग्रेसकडून पाठबळ दिले जात असल्याची चर्चा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi