Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रवादीचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर

राष्ट्रवादीचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर
मुंबई , सोमवार, 22 सप्टेंबर 2014 (17:20 IST)
ऐन विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे दोन आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे विश्वसनिय वृत्त आहे. यात भुसावळचे आमदार आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार संजय सावकारे आणि आमदार किसन कथोरे यांचा समावेश आहे. दोन्ही आमदार आज (सोमवार) भाजप) प्रवेश करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेले भुसावळचे आमदार संजय सावकारे आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. दोघेही

दरम्यान, भाजप आणि शिवसेना या महायुतीतील प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाचा गुंता अजून कायम आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi