Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रवादी-कॉंग्रेसमध्ये जागावाटपावरुन ताणातणी सुरुच

राष्ट्रवादी-कॉंग्रेसमध्ये जागावाटपावरुन ताणातणी सुरुच
मुंबई , मंगळवार, 16 सप्टेंबर 2014 (09:17 IST)
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचा जागावाटपाचा घोळ अद्याप सुटलेला नाही. जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये तणातणी सुरु आहे. राष्ट्रवादी 144 जागांवर अडून बसला आहे. 
सोमवारी एका मंत्र्यासह नऊ अपक्ष आमदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीने 288 पेकी 144 जागा लढण्याचा निर्धार केल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत जागावाटपावरून चर्चा झाली. कॉंग्रेसने अद्याप उत्तर दिलेले नाही. आम्ही उत्तराच्या प्रतिक्षेत आहे. आता चेंडू कॉंग्रेसच्या कोर्टात आहे. कॉंग्रेससोबत आघाडीशिवाय लढणार का? या प्रश्नाला पवारांनी  मात्र बगल दिली. दरम्यान, अपक्ष मंत्री दिलीप सोपल यांनी अजित पवार यांना फोन करून ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे कळवले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi