मनसे प्रमुख राज ठाकरे यांना फक्त 'ठाकरे' या आडनावामुळे वलय आहे. अन्यथा त्यांना कुत्रे विचारणार नाही, अशा शब्दात रिपाइं महिला आघाडीची प्रमुख राखी सावंतने राज यांच्यावी टीका केली आहे.
राखी म्हणाली, मराठी अस्मितेचे राजकारण करणारे सत्तेचे दलाल आहेत. आपल्या बापासमान नेत्यांची अशी खिल्ली उडवणे राज यांना शोभत नाही. राखी सावंतने ही सध्या रिपाइंचा प्रचार करत असून तिने राज यांनी केलेल्या रामदास आठवलेंच्या खिल्लीचा वचपा काढला. शिवसेनेने आठवले यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्याची राज यांनी सभेत खिल्ली उडवली होती.