महायुतीचा जागावाटपाच्यामुद्यावरून तडजोड करून मार्ग काढला असताना काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. मुंबईत झालेल्या आजच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.
राष्ट्रवादीने 144 जागांसाठी कॉंग्रेससमोर आग्रह धरला होता. आता मात्र राष्ट्रवादीने 10 जागाची तडजोड करून 13 जागांसाठी हट्ट धरला आहे. त्यामुळे आघाडीचे चर्चेचं गुर्हाळ पुन्हा थांबले आहे. राष्ट्रवादी 134 जागांपर्यंत यायला तयार आहे. मात्र काँग्रेस एकही जागा वाढवून देण्यास तयार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
काँग्रेस याबाबतचा निर्णय दिल्लीतील नेत्यांना सांगेल, त्यानंतरच काय तो निर्णय घेतला जाणार असल्याचं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं. मात्र आज रात्री साडेआठ वाजता आघाडीच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा बैठक होणार आहे.