विधानसभा निवडणुकीचे काउंटडाऊन सुरु झाले असून आज शनिवारी अधिसुचना जाहीर होणार आहे. परंतु अद्याप काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. परंतु आघाडीत चिघळलेला वाद दोन दिवसांत सुटण्याची चिन्हे दिसत आहेत.
अंतिम तोडगा काढण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक होणार असून, त्यात वाद निकाली काढले जातील. दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र लढण्यास संमती दिली असून कोणत्याही परिस्थितीत आघाडी तुटू द्यायची नाही, असे निर्धार केला आहे.
दुसरीकडे, शिवसेना- भाजप यांच्यातील युती देखील अखंड राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. जागांच्या वाटाघाटीला वेग दिला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.