महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून झालेल्या 'महाभारतात' कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील 15 वर्षांची आघाडी तुडली. आघाडी काँग्रेसमुळे तुटलेली नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले आहे.
माझ्यामुळे किंवा राहुल गांधींमुळे आघाडी तुटली नसल्याचेही सोनियांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडी तुटण्यासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचे खापर फोडले होते. त्यावर सोनिया गांधींनी यांनी मंगळवारी स्पष्टीकरण देऊन राष्ट्रवादीचे आरोप फेटाळून लावले.
सोनिया गांधी जम्मूच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलत होत्या. पूरग्रस्तांच्या चौकशीसाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोन दिवस जम्मूत आहेत. यावेळी सोनियांना महाराष्ट्रातील आघाडीविषयी विचारणा झाली. त्यावेळी सोनिया उत्तर न देता निघून गेल्या.