शिवसेनेसोबतचे शिवबंधन तोडून भागपच्या गोटात सामील झालेले रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि खासदार रामदास आठवले यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे. तो म्हणजे उद्धव ठाकरे आमच्या पक्षात फूट पाडत असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रिपब्लिकन पक्षातील नेते अर्जुन डांगळे यांनी रामदास आठवले यांची साथ सोडून शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 'मातोश्री'वर जाऊन डांगळे यांनी उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली.
भाजपच्या नेतृत्त्वाखाली महायुतीसोबत जाण्याचा निर्णय अर्जुन डांगळे यांच्याशी चर्चा करूनच आपण घेतला होता. त्यांनीच भाजपसोबत जाणे अधिक योग्य ठरेल, असे म्हटले होते, असे रामदास आठवले यांनी सांगितले आहे.
गेल्या आठवड्यात शिवसेना- भाजपमधील युती तुटल्यानंतर महायुतीमधील घटक पक्षांनीही भाजपला पाठिंबा दिला होता. त्यात रामदास आठवलेंचा पक्ष रिपइंचाही समावेश आहे