Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तरुणांनो परत फिरा, नांगर हाती घ्या, मोदींचा नक्षलवाद्यांना सल्ला

तरुणांनो परत फिरा, नांगर हाती घ्या, मोदींचा नक्षलवाद्यांना सल्ला
कोल्हापूर/सांगली/गोंदिया , सोमवार, 6 ऑक्टोबर 2014 (10:23 IST)
नक्षली तरुणांनो परत फिरा, खांद्यावर बंदूक घेतल्याने विकास होत नाही तर नांगर हाती घेतल्याने होतो. हिंसाचाराने कोणाचेच भले झाले नाही, असा सला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलवाद्यांना घातली. भाजपच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांनी राज्याच्यातील कोल्हापूर, सांगली आणि गोंदिया येथे सभा घेतल्या. भाजपला एकहाती सत्ता द्या, राज्यातील एलबीटी रद्द करू, असे आश्वासन मोदी यांनी दिले. 
 
पावसामुळे मोदींची नाशिक येथील सभा रद्द करण्यात आली ही सभा मंगळवारी(7 ऑक्टोबर) होणार आहे. रविवारी तासगाव (सांगली), कोल्हापूर व गोंदियात सभा झाले्लया सभांमध्ये मोदींनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर खोचक टीका केली. परंतु शिवसेनेच्या विरोधात एक शब्दही बोलणार नसल्याचेही मोदींनी स्पष्‍ट केले. 
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. ते माझा आदर्श आहे. म्हणून शिवसेनेच्या विरोधात शब्दही बोलायचे नाही, असे ठरवल्याचेही मोदी यांनी सांगितले. हीच माझी बाळासाहेबांना श्रद्धांजली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी मांडली. 
 
तासगाव येथील सभेत मोदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा चांगलेच फटकारले. मोदी म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री असताना पवारांना मुंबई विमानतळ, व्हिक्टोरिया स्टेशनला शिवरायांचे नाव देण्याचे कधी सुचले नाही. वाजपेयी सरकारने ते केले. बारामतीपेक्षा सुरतमध्ये शिवरायांचा मोठा पुतळा आम्ही उभारला. आम्हाला शिवभक्ती शिकवू नका, ती आमच्या रक्तात, संस्कारांमध्ये आहे. शिवरायांचा एकही गुण तुमच्यात येऊच शकत नाही. सभेत मोदी म्हणाले, मी शिवसेनेच्या विरोधात काहीही बोलत नाही, अशी माध्यमांनी माझ्यावर टीका केली आहे. बाळासाहेबांनी मोठ्या संघर्षातून शिवसेना उभारली. जगाची टीका सहन करत ती वाढवली. राजकारणापलीकडे जाऊन काही आदर्श, तत्त्वे असतात, त्यांना राजकारणाच्या तराजूत मोजता येत नाही. 

Share this Story:

Follow Webdunia marathi