Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरात्रीतच निवडणुका का? राज ठाकरेंचा आयोगाला सवाल

नवरात्रीतच निवडणुका का? राज ठाकरेंचा आयोगाला सवाल
वणी , बुधवार, 1 ऑक्टोबर 2014 (14:01 IST)
महाराष्‍ट्रात नवरात्रीतच विधानसभा निवडणुका का, पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीत निवडणूका घेतल्या असत्या का असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित आहे. राज ठाकरे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जाहीर सभेत बोलत होते.
 
गणपती गेले आणि नवरात्रोत्सव सुरु झाला. तसेच लवकरच दिवाळी येईल, अशा सणासुदीच्या दिवसांनामध्या राज्यात निवडणूका घेण्याची काही गरज होती का? अशा शब्दात राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचा समाचार घेतला.

पश्चिम बंगालमध्ये जर या दिवसांमध्ये निवडणुका असत्या तर, तेथील सर्व पक्ष एकत्र आले असते. आयोगाला निवडणुका पुढे ढकलल्या लागल्या असत्या. परंतु आपल्याकडे तर निवडणूक महत्त्वाची. सणांचे काय, असेही राज म्हणाले. 
 
वणीमधून मनसेचे राजू उंबरकर हे निवडणूक रिंगणात आहेत. उंबरकरांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी वणी येथे सभा घेतली.  दरम्यान, ऑक्टोबर हिटमुळे सर्वच नेत्यांच्या सकाळच्या सभांना गर्दी कमी आहे. त्याचा फटका राज ठाकरेंच्या सभांनाही बसत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi