राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि दक्षिण कराड मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नितीन गडकरी भ्रष्टाचारी आहेत, असे वाटत होते परंतु त्यांची आता बुद्धीही भ्रष्ट झाली असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
नितीन गडकरी यांनी कराड येथील सभेत सांगितले होते की, चव्हाण यांची भाजपमध्ये येण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी आपल्याला फोन केल्याचे गडकरी यांनी म्हटले होते. त्यावर चव्हाण यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.
चव्हाण यांची गावचा सरपंच होण्याचीही लायकी नसल्याचे गडकरी यांनी म्हटले होते. चव्हाण यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केल्याचा आरोपही गडकरी यांनी केला होता.