विधानसभा निवडणुकीचे मतदान 15 ऑक्टोबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगातर्फे सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.
राज्यास सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवा अर्थात रुग्णालय, पोलिस विभाग आदी याला अपवाद आहेत. या कर्मचार्यांना मतदानासाठी दोन तास सवलत देण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.
राज्यातील विविध दुकाने, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम, तसेच माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स आणि इतर कामगारांना सार्वजनिक सुटी देण्याची सूचना देण्यात आली आहे.