Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरेंची शिवसेना-भाजपवर घणाघाती टीका

राज ठाकरेंची शिवसेना-भाजपवर घणाघाती टीका
मुंबई , सोमवार, 29 सप्टेंबर 2014 (10:48 IST)
गेले काही दिवसांपासून राज्यात आकड्यांचा खेळ सुरु होता. सोबत पक्षांतराचे वारे सुरु आहे. सगळीकडे नुसता तमाशा सुरु आहे . राज्याच्या राजकारणात अशी परिस्थिती कधीही आली उद्भवली नव्हती. मात्र घडत नाही आहे तर हे सगळे ठरवून घडवल जात असल्याता आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.  राज ठाकरे यांनी शिवसेना, भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. राज ठाकरे यांनी कांदिवली येथे राज ठाकरेंची जाहीर सभेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

मागील काही दिवसांपासून राज्यात तमाशा सुरु असून तो आपण सगळेजन बघत होतो. जागा वाटपावरुन महायुती आणि आघाडीत झालेल्या वादावरही त्यांनी सडकून टीका केली. सध्या इंजिनमध्ये इंधन भरले असून जोमाने प्रचार करणार अल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाला आहे. यावरही राज ठाकरे यांनी भाष्य केले. शिवसेनेच्या ठिकाणी मी असतो तर महिनाभरापूर्वीच भाजपला लाथ मारु गेलो असतो. भाजपने अपमान करुनही शिवसेनेने केंद्रीय मंत्रीपद सोडलेले नाही, महापालिकेतील युती कायम आहे, ही लाजीरवाणीच बाब असल्याचे राज ठाकरे म्हणाले. गेल्या निवडणुकीत भाजपचे काही नेते मनसेत यायला इच्छुक होते असा गौप्यस्फोटही राज ठाकरेंनी यावेळी केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi