आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे इच्छुकांची भाऊगर्दी असून आघाडीच जागावाटपात जिल्ह्यात काँग्रेसकडे असलेल्या 6 मतदारसंघात तब्बल 40 जण इच्छुक असून त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने सोमवारी अखेर इच्छुकांचे अर्ज मागविले होते. त्यानुसार अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज देऊन रितसर उमेदवारी मागितली आहे. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आहे. आघाडीच्या या जागावाटपात अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, शहर उत्तर, शहर मध्य, बार्शी, सांगोला हे सहा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाला आहेत. येणार्या निवडणुकीत या जागावाटपात बदल होऊ शकतो. मात्र तरीही पक्षाच्या उमेदवारांनी मोहोळ वगळता काँग्रेसकडे असलेल्या जागांवरच उमेदवारी मागितली आहे. मोहोळ मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाटय़ाला असला तरी तेथून गौरव खरात यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे.
सर्वाधिक इच्छुक उमेदवारांची संख्या शहर उत्तर व सोलापूर दक्षिण मतदारसंघात आहे. या दोन्ही मतदारसंघात प्रत्येकी अकरा जणांनी उमेदवारी मागितली आहे. शहर मध्य मतदारसंघात केवळतिघांनीच इच्छा व्यक्त केली आहे. आमदार प्रणिती शिंदे, माजी महापौर अँड. यू. एन. बेरिया, माजी नगरसेवक तौफीक शेख यांनी पक्षाकडे रितसर उमेदवारीचा अर्ज सादर केला आहे. सोलापूर दक्षिणमधून आमदार दिलीप माने यांच्यासह राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, उमाकांत राठोड, इंदुमती अलगोंडा, अशोक देवकते, अशोक चव्हाण, जाफरताज पाटील, हरीश पाटील, सतीश पाटील, विजया पाटील यांनी उमेदवारी मागितली आहे. सोलापूर दक्षिणमध्ये दिग्गज नेत्यात चुरस असल्याचे दिसून आले.
शहर उत्तरमधून चाकोते कुटुंबातील विश्वनाथ चाकोते, महादेव चाकोते, सिध्दाराम चाकोते या तिघा बंधूंसह अँड. यू. एन. बेरिा, प्रकाश वाले, अमोल शिंदे, सुभाष मुनाळे, सुनील खटके, सुनील रसाळे, गंगाधर गुमटे, राजन कामत यांनी उमेदवारी मिळण्यासाठी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत.
अक्कलकोट मतदारसंघातून माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, उमाकांत राठोड, राजशेखर शिवदारे, भीमाशंकर जमदार, महिबूब मुल्ला या पाचजणांनी उमेदवारी मागितली आहे.
बार्शीमधून शिवाजी बर्चे, सुधीर गाढवे, अनंत कुलकर्णी तर सांगोलतून प्रा. प्रबुध्दचंद्र झपके, जगदीश बाबर, चंद्रकांत पवार, शंकर सरगर, जसिंग पाटील, सीताराङ्क वाघङ्कोडे हे इच्छुक आहेत. ा सर्वानी उङ्केदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केले आहेत.
पंढरपूर, म ढा, करमळा व मळशिरस हे मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आहेत. त्यामुळे येथून काँग्रेसकडून कोणीही उमेदवारी मागितली नाही.