महायुतीमधील घटकपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेल्याचे राजू शेट्टी यांनी खुद्द सांगितले. शिवसेना सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय आम्ही विचार करुन घेतल्याचे शेट्टी यांनी शुक्रवारी सांगितले.
शिवसेनेच्या जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भाजपने सेटींग केली होती. परंतु शिवसेनेने भाजपाचा हेतू साध्य होऊ दिला नाही. जागावाटपाचा गुंता अखेरच्या क्षणापर्यंत न सुटल्यामुळे दोन्ही पक्षातील युती संपुष्टात आली.
चार घटकपक्षांना देण्यासाठी जागा कोणत्या पक्षाकडे जास्त आहेत, ते पाहून त्यांच्यासोबत आम्ही जाऊ असे स्पष्ट मत राजू शेट्टी यांनी मांडले होते. घटकपक्ष आणि भाजप यांच्या असलेल्या महायुतीत आम्हाला आता सन्मान मिळेल असे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी म्हटले. तर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले मात्र अद्याप निर्णय कळवलेला नाही. रामदास आठवले शिवसेना सोडून जाणार नसल्याचे विश्लेषकांनी मत मांडेले आहे.