विधानसभा निवडणूक न लढविण्याचा आम आदमी पक्षाने (आप) निर्णय घेतल्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले आहे. त्यात ‘आप’च्या राज्य समन्वयक अंजली दमानिया आणि राज्य सेक्रेटरी प्रीती मेनन-शर्मा यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मरगळ आल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या मे महिन्यात लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागला होता.
घरच्या जबाबदारीमुळे तसेच व्यवसायामुळे पक्षाचे काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आपण राजीनामा देत आहोत, असे दमानिया आणि प्रीती मेनन यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.