नसानसातुन धांवत होते देशप्रेम सळसळून,
प्रखर भावना देशाप्रती होती ठासून भरून,
जन्माव च लागतं आशा थोर क्रांतीकारकांना,
एका रात्रीतुन जन्मा येत नाही ही भावना,
कष्ट तरी किती सोसाव, त्याची न सीमा,
वाहून घेतले ह्या विराने, समर्पणाची परिसीमा,
काळ्या पाण्याची शिक्षा, होता जिवंत नरकवास,
जाता अंदमानात , काय झेलले तुम्ही होतो भास,
हे तेजस्वी माणसा स्वीकार अभिवादन आमुचे,
तळपत्या सुर्या सम तळपले तेज तुमचे!
होतेच तुम्ही थोर समाजसुधारक आहे ठाव,
एक उत्तम लेखक ही होता,कवी मन ही तुम्हीच जपावं,
मार्ग दाविला तुम्ही कित्येक जणांना,
अभिमान आम्हांस तुमचा,घ्यावी मानवंदना!
.....सावरकरांना विनम्र अभिवादन !!