सध्या राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना विरोध करता करता हिंदीलाही विरोध करायला सुरवात केली. मुंबईच्या सभेत तर त्यांनी राष्ट्रभाषा कोणती असावी या प्रश्नावरून घटना समितीतच कसे वाद होते, याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकातील उताराच वाचून दाखविला. याच विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे विचार.......
आपले मराठी साहित्य हे भारतीय साहित्याचे ऐक उपांग असल्याने भारतीय साहित्य जीवनाचे बरे वा वाईट परिणाम महाराष्ट्रीय साहित्यावर झाल्यावाचून रहाणार नाहीत. भारताची राष्ट्रभाषश हिंदी असावी असा हिंदुजगताचा निर्धार झाला नाही. काही बंगाली साहित्यिकांनाही वाटले की बंगाली हीच देशाची राष्ट्रभाषा असावी, तसे मराठी साहित्यकांनाही वाटले की अटकेपर्यंत हिंदुध्वज फडकविणार्या आम्हा मराठ्यांची मराठी भाषा हीच भारताची राष्ट्रभाषा का असू नयेपण हा विचार योग्य नाही. संस्कृतनिष्ठ हिंदी हीच भारताची राष्ट्रभाषा असावी असे मी म्हणतो, याचे मुख्य कारण ती भाषा ऐकंदरीत अखिल भारतात बहुजन समाजाने इतर कोणत्याही भाषेतून अत्याधिक प्रमाणात बोलली जाते, समजली जाते, लिहील जाते आणि ती इतर कोणत्याही रीतीने राष्ट्रीय विचारांच्या विकासाला व प्रगतीला साहाय्यभूत होण्यास कोणत्याही प्रकारे अक्षम नही. ही दोन्ही लक्षणे हिंदीस इतर कोणत्याही प्रांतिक भाषेपेक्षा अधिक लागू आहेत. आज आठ कोटी लोक ती बोलत आहेत. खरे पहाता ती अशीच हिंदुस्थानची राष्ट्रबोली झालेली आहे. रामेश्वरापासून काश्मीर पर्यंत आज दोन सहस्त्र वर्षे झाली. लाखो हिंदू प्रवासी तीर्थतयात्री, व्यापारी जे जात येत, दळणवळण ठेवीत आले ते या हिंदी बोलीच्या बळावरच काय ते. निष्यान जुने साहित्यही भरपूर आहे. मराठक्षची ती सरखी बहीणच आहे. म्हणून मराठीला हिंदी राष्ट्रभाषा झाल्यास आनंद वाटावा, हेवा वाटू नये. हिंदीची वृत्तीही वरचढ नाही. महाराष्ट्राच्या हाताचा प्रेमाधार घेऊनच ती राष्ट्रभाषा पदावर चढत आहे.