Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाहुनि कोरडी चंद्रभागा ... ओलावले नयन पांडुरंगा !

पाहुनि कोरडी चंद्रभागा ... ओलावले नयन पांडुरंगा !

वेबदुनिया

WD
लाखो भाविकांच्या साक्षीने संपन्न होणारा आषाढी भक्ती सोहळा अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, धार्मिक संसारामध्ये पवित्र मानली जाणारी चंद्रभागा अजूनही कोरडी असल्याने भाविक चिंतातूर असून ते ‘पाहुनि कोरडी चंद्रभागा.....ओलावले नयन पांडुरंगा’ असे म्हणून पांडुरंगाला आपली व्यथा सांगत आहेत.

राज्यात दुष्काळाची भीषण दाहकता पसरल्याने यंदा नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. त्याचाच परिणाम चंद्रभागा नदीवरही झाला. या नदीचे पात्र कोरडे पडल्याने गेल्या वर्षभरात लाखो भाविकांना चंद्रभागेतील पवित्र स्नानाला मुकावे लागले, तर अनेक भाविकांनी चंद्रभागेच्या गढूळ पाण्यातच पवित्र स्नान उरकले.

कार्तिक वारीच्या सोहळ्यात ही चंद्रभागा अशीच निरव कोरडी होती. ऐन कार्तिकीच्या दिवशीच पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे भाविकांना पवित्र स्नान उरकता आले. इतरवेळा मात्र पवित्र स्नानाविनाच चंद्रभागेचे दर्शन घ्यावे लागले. सध्या आषाढी वारी अगदी काही दिवसांवर आली असून संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या अध्र्या रस्त्यावर येऊन पोहोचल्या आहेत. काही दिवसांतच या

पालख्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार असून या पालख्या जशा जवळ येत आहेत, तशी पंढरीतील भाविकांची गर्दी वाढत आहे. या भाविकांना अद्याप कोरड्याच चंद्रभागेचे दर्शन होत आहे. त्यामुळे भाविक ज्या उत्साहाने पंढरीत आला, त्याचा उत्साह कोरड्या पात्रामुळे काही प्रमाणात ओसरला. दरम्यान, भाविकांच्या सुविधेचा भाग म्हणून आषाढी सोहळ्यासाठी चार ते पाच दिवस अगोदर चंद्रभागेत पाणी सोडण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तरीही चंद्रभागेकडे पाहून भाविकांच्या हृदयात या कोरड्या चंद्रभागेकडे पाहून पाहुनी ‘कोरडी चंद्रभागा... ओलावले नयन पांडुरंगा’ , असाच सूर निघत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi