विधिमंडळात गोवंशहत्या बंदीचा कायदा मंजूर होऊनही सत्ताधारी लोक तो लागू करत नाहीत. अठरा वर्षांपासून हा कायदा प्रलंबित आहे. राज्याच्या या कायदा लागू करण्याची इच्छाशक्ती नसलेल्या सरकारला गोप्रेमी विठ्ठलाची पूजा करण्याचा हक्कच नसल्याचे ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराड कराडकर यांनी सांगितले. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, गोहत्याबंदी कायदा लागू करेपर्यंत आषाढी व कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्र्यांना करू देणार नाही, असा इशाराच बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. सत्ताधार्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुभवातून शहाणे होण्याची संधी गमावली तर ते राज्यकर्त्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल, असेही कराडकर यांनी सांगितले.