Publish Date: Thu, 07 Jul 2022 (11:51 IST)
Updated Date: Sat, 09 Jul 2022 (13:43 IST)
देव माझा विठू सावळा
माळ त्याची माझिया गळा… || धृ ||
विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी,
भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळ… || १ ||
साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर
कंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा… || २ ||
भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो
रांगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा… || ३ ||