Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आषाढी एकादशी विशेष : काय सांगता देव सुद्धा झोपतात !!!...वाचा ही मनोरंजक माहिती ...

ashadhi ekadashi
, शनिवार, 2 जुलै 2022 (09:56 IST)
- पं. हेमन्त रिछारिया
शास्त्रानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला 'विष्णुशयन' किंवा 'देवशयनी' एकादशी म्हणतात. यंदाच्या वर्षी देवशयनी एकादशी 1 जुलै 2020 रोजी आहे. 'देवशयनी' एकादशी म्हणजे भगवंतांच्या झोपण्याची सुरुवात होणे. देवशयन पासूनच चातुर्मास सुरू होतं. देवशयानाच्या दरम्यान लग्न, गृहपूजा, वास्तू शांत, जावळ या सारखे मंगळ कार्य केले जात नाही. 
 
आपल्या सनातन धर्माचे सौंदर्यच हेच आहे की आम्ही आपल्या देश काळ परिस्थितीनुसार व्यवस्थांना धर्म आणि ईश्वराशी जोडलं आहेत. धर्म एक व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेला व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांचा नियमांचे पालन करायला हवं. कोणत्याही नियमांना समाज फक्त दोन कारणास्तव मानतो पहिले कारण म्हणजे 'लोभ' आणि दुसरं कारण म्हणजे 'भय' या व्यतिरिक्त तिसरे आणि सर्वश्रेष्ठ कारण आहे 'प्रेम' पण त्या आधारास महत्त्व देणारे कमीच असतात. जर आपण सध्याच्या समाजाच्या देवाला लोभ आणि भयाचे एकत्रित रूप म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. 
 
देवसुद्धा झोपतात का.....?
हिंदू धर्मातील देवशयनी उत्सवाच्या मागील आध्यात्मिक कारणापेक्षा देशकाळासारखी कारणे आहेत. सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होऊन गृह केंद्रित होतं. आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितले तर समजत की देवशयन कधीही होतच नाही. ज्याला निद्रा स्पर्श करू शकत नाही आणि जो माणसाला झोपेतून जागा करतो तोच ईश्वर आहे. 
 
विचार करा की देव झोपला तर या साऱ्या विश्वाच काय होणार ! ईश्वर हे झोपल्यावर देखील जागृत राहणाऱ्या घटकाचे नाव आहे आणि त्याचा प्रकट मात्र झाल्याने माणूस झोपेतून सहजच जागा होतो. गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की 'या निशा सर्वभूतानाम् तस्यां जागर्ति संयमी' म्हणजे जेव्हा सर्वांसाठी रात्र असते, तेव्हा संन्यासी जागत असतो. ह्याचा अर्थ असा नाही की शारीरिकदृष्ट्या योगी किंवा संन्यासी झोपत नाही ते झोपतात पण चैतन्याच्या दृष्टीने जागृत असतो.
 
निद्राच नाव विश्व आहे आणि जागरणाच नाव 'ईश्वर' आहे. आपण स्वतः विचार करा की तो परम जागृत असणारा परमात्मा कसं काय झोपू शकतो ! देव शयन, देव जागरण या सर्व गोष्टी व्यवस्थित आहे. जर सध्याच्या पिढीला धर्माशी जोडायचे असेल तर त्यांना या परंपरेच्या मागील उद्दिष्टे जाणून घेणे आवश्यक आहे. 
 
आपण देवशयनी एकादशीला आपल्या इच्छा आणि वासनांच्या संयमाच्या संदर्भात बघतो. आपल्या शास्त्रामध्ये देखील देवशयनाच्या काळात काही गोष्टी निषिद्ध आणि वर्ज्य पाळण्याचे निर्देश दिले आहे, जेणे करून साधक देवशयानाच्या काळावधीत संयमित आयुष्य जगू शकेल. देवशयन आपल्याला त्यागाच्या मार्गावर वाटचालीसाठी मदत करत. 
 
चला तर मग शास्त्रानुसार जाणून घेऊया की देवशयनाच्या काळात साधकांनी कोणते नियम आणि शिस्त पाळायला हवं.
1 साधकांना भाष्य सिद्धी प्राप्त करावयाची असल्यास देवशयानाच्या काळावधीत गोड पदार्थांचा त्याग करावा.
2 ज्या साधकांना दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळवायचे असल्यास त्यांनी देवशयानाच्या काळात तळकट वस्तूंचा त्याग करावा.
3 ज्या साधकांना कुटुंबाची वाढ आणि मुलं -नातवंडांची प्रगती हवी असल्यास त्यांनी देवशयानाच्या काळावधीत दूध किंवा दुधापासून बनलेल्या वस्तूंचा त्याग करावा.
4 ज्या साधकांना अश्वमेघ यज्ञाचे फळ मिळवायचे असल्यास त्यांनी देवशयनाच्या काळावधीत धातूंच्या भांड्यांचा त्याग करून पत्रावळी वर जेवावं. 
5 ज्या साधकांना आपले सर्व ज्ञात आणि अज्ञात पाप नाहीसे करावयाचे असल्यास देवशयानाच्या काळात 'अयाचित' किंवा एकभुक्त जेवण करावं.
* अयाचित म्हणजे असं जेवण जे मागितल्याशिवाय मिळतं.
* एकभुक्त म्हणजे दिवसातून फक्त एकदाच जेवायचे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Damru Benefits: शिवजींचा डमरू खूप आहे चमत्कारी, घरात या जागेवर ठेवल्याने होतील अनेक फायदे