काया ही पंढरी आत्मा पांडुरंग....
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणार्या भाविकांची संख्या कमी नाही, परंतु ज्यांना पंढरीला जाऊन विठू माऊलीचे दर्शन घेता येत नाही असे पंढरीचे वारकरी आपण रहातो त्या जागेलाच पंढरपुर मानत आषाढी साजरी करतात. मध्य प्रदेशातील इंदूरमधील वारकर्यांनी आषाढी कशा पद्धतीने साजरी केली त्याचा हा चित्र वृत्तांत.....
हे इंदूरमधील पंढरीनाथ मंदीर...
पंढरपुरच्या श्री विट्ठलाचा महिमा अपरंपार आहे. आजही लाखो भाविक आषाढी कार्तिकी पंढरपुरची वारी न चुकता करतात. परंपरेनुसार चालत आलेल्या हया वारीला लाखो भाविक तन मन धन विसरून विट्ठलाच्या चरणी लीन होतात. हा इंदूरमधला पांडुरंग....
'देव दिसे ठाई ठाई भक्त लीन भक्तापाई
सुखालागी आला या हो आनंदाचा पूर, अवघे गरजे इंदूर.....
इडापिडा टळुनि जाती देहाला या लाभे मुक्ती
नामरंगी रंगले हो संतांचे माहेर....
अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळु
मी म्हणे गोपाळु, आला ते माये....