Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुकोबा पालखीचे पुण्यात भव्य स्वागत

तुकोबा पालखीचे पुण्यात भव्य स्वागत

वेबदुनिया

WD
विठ्ठल माझा जिव अन् विठ्ठल माझाच भाव आहे, व माझा कुळाचा देव आहे, असा मनोमन भाव असणारे वारकरी, संत तुकोबारायांच्या पालखी समवेत चालत आहेत. हा पालखी सोहळा आकुर्डी येथील मुक्काम आटोपून मुख्य पुणे शहरात दाखल झाल्याने, द्येचे माहेर घर असणा-या पुणेकरांनी तोफांची सलामी देत, ढोल, पालखी, हरीनामाची मानवंदना देत, पंच पक्वानाचे भोजन देत पालखी सोहळ्यांचे शाही स्वागत केले.

१ जुलै रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आकुर्डी येथिल विठ्ठल मंदिरातील मुक्काम आटपून, पहाटे पाच वाजण्यांच्या सुमारास रवाना झाला. पालखी समोर देशमुख महाराज यांचे हरीकिर्तन रात्री झाले व तद्नंतर शाही प्रासादिक दिंडीतील वारक-यांनी रात्रभर जागर केला,जागर करुन पहाटेचा काकडा पालखी समोर झाला. पहाटे मानांच्या वारक-यांकडून महापूजा करण्यात आली. ‘‘पुंडलीक वरदे हरी विठ्ठल....हा नाम घोष करुन पालखी सोहळा एम.ए कॉलनी, पिंपरी येथे पहिल्या विश्रांतीसाठी मानाचा अभंग घेवून थांबला,कासारवाडी, दापोडी मार्ग, वारुडेवाडी, शिवाजीनगराहून थेट संत तुकाराम महाराज पादुका मंदीर, फग्र्युसेन रोड येथे पालखी मजल दरमजल करीत पोहचला या चार जागांच्या विश्रांती घेवून, निंवडुगा विठ्ठल मंदिर नाना मंदीर पेठ पुणे कडे मुक्कमासाठी रवाना झाला.

विठ्ठल दर्शनाची आस, हरीनामाचा जयघोष करीत पुणेकरांचा हा पालखीचा सोहळा स्वर्गातही नाही असेच अभंग दिंडीत चालणा-यां वारक-यांचा मुखातून बाहेर पडत होते. वैष्णवांची भगवी पताका, तुळशीवाला हांडे यांचा समुदाया या सोहळ्यांला चांगलीच रंगत आणित आहेत. एकतरी भजनी मंडळ, चिपळ्यांचे भजन यांची कवणे तर ऐकून अक्षरश देहाचा विसर पुणेकरांचा झाला आहे.

यंदा पालखी सोहळ्यांचे समवेत बालचिमुरडी वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. वयाचा विचार न करता गळ्यातं घेतलेले पखवाज हातात घेतलेले टाळांतून ज्ञानोबा तुकाराम... ज्ञानोबा तुकाराम असा आवाज काढित होते. माऊलीच्या हरीपाठ नाचून पालखी सोहळ्यांत ही बालचिमुरडी वारकरी म्हणत आहेत. या सा-या धार्मिक वातावरणामुळे धर्म संस्कृती पाळण्याचा व वाढविण्याचा या बाल वारक-यांकडून संदेश मिळत आहे.

नानापेठ पुणे येथे सलग दोन दिवस पालखी सोहळ्यांचा मुक्काम असल्याने दर्शन, किर्तन, संताचा सहवास, अन्नदान हे सारं मात्र प्रथेप्रमाणे,रीतीरिवाजाप्रमाणे पुणे शहर असताना देखिल नागरिक स्वागत करीत आहेत. घराघरा समोर हरीनाम गजर होत असल्याने पुण्याला पंढरीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. देहुचे संत तुकोबा आणि पंढरीचा पांडूरंग ही पुणेकर मंडळी हेची दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा असेच मागणे मागित असल्याचा भाव दिसून येत होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi