Look-Back-Entertainment : बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये या वर्षी अनेक जणांचे विवाह झाले. तसेच 2024 हे वर्ष बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीसाठी लग्नाचे वर्ष ठरले.तसेच यातील काही जोडप्यांनी त्यांचे लग्न मोठ्या थाटात साजरे केले, तर काहींनी हा खास क्षण त्यांच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत एका खाजगी समारंभात शेअर केला. सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बाल ते नागा चैतन्य-शोभिता धुलिपाला या सेलिब्रिटी जोडप्यांचे विवाह वर्षभर चर्चेचा विषय राहिले आहे. चला जाणून घेऊया अशा प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल्सचे नावे
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल-
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल या जोडप्याने 22 एप्रिल 2024 ला लग्न केले. यांचा विवाह भव्यसोहळ्यात पार पडला. ज्यामध्ये अनेक मोठे स्टार्स सहभागी झाले होते.
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी-
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी 21 फेब्रुवारी 2024 ला गोव्यामध्ये लग्न केले. या जोडप्याचे लग्न समुद्र किनाऱ्यावर झाले. यांच्या विवाहसोहळ्यात फक्त मित्र परिवार आणि कुटुंब उपस्थित होते. यांचा विवाह सोहळा हा अत्यंत सध्या पद्धतीने पार पडला.
पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा-
पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांनी देखील 15 मार्च 2024 मध्ये लग्न केले. यांचा विवाहसोहळा गुरुग्राम मध्ये संपन्न झाला. यांनी देखील साध्या पद्धतीने विवाह केला. ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि मित्रपरिवार उपस्थित होते.
सुरभी चंदना आणि करण शर्मा-
सुरभी चंदना आणि करण शर्मा या जोडप्याने देखील 15 मार्च 2024 मध्ये जयपुर मध्ये लग्न केले. यांच्या विवाहात परंपरा आणि स्टायलिश सुंदर असा मेळा दिसला.
Edited By- Dhanashri Naik
इरा खान आणि नुपूर शिखरे-
इरा खान आणि नुपूर शिखरे यांनी 20 फेब्रुवारी 2024 ला गोव्यामध्ये लग्न केले. यांच्या विवाह सोहळा समुद्रकिनारी अगदी कमी पाहुण्यांमध्ये पार पडला.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला-
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला या जोडप्याने 4 डिसेंबर 2024 ला लग्न केले. यांचा विवाहसोहळा साध्या पद्धतीने पार पडला. ज्यामध्ये फक्त मित्र परिवार आणि कुटुंब उपस्थित होते.
हिमांश कोहली आणि विनी कोहली-
हिमांश कोहली आणि विनी कोहली यांनी 12 नोहेंबर 2024 ला लग्न केले. हा विवाह साध्या पद्धतीने पार पडला. ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि मित्र परिवार उपस्थित होते.