Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Covid-19 : मनाच्या सामर्थ्याने कोरोनाला जिंकू शकता, या गोष्टी अमलात आणा

Covid-19 : मनाच्या सामर्थ्याने कोरोनाला जिंकू शकता, या गोष्टी अमलात आणा
, सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (09:47 IST)
कोरोनाशी लढा देताना मनःशक्ती असणं महत्त्वाचं असत. कोणती ही परिस्थिती असो आपल्या मनाला बळकट करणं महत्त्वाचे असते. मनाने कमकुवत असलेला माणसाला अधिक त्रास होतो आणि त्याचा परिणाम त्याचा आयुष्यावर पडतो. सध्याच्या काळात कोरोना साथी च्या रोगाने सर्वत्र उच्छाद मांडला आहे. लाखोच्या संख्येत लोकं मृत्युमुखी झाले आहेत. तर काही लोकं या मधून बरे देखील झाले आहेत. ते कोरोनाशी लढा देऊन पूर्णपणे बरे होऊन पूर्ववत आपल्या कामाला लागले आहेत. 
 
कोरोनाशी लढा देताना मनाचे सामर्थ्य असणे खूप महत्त्वाचे आहे. अशी बरीच जण आहे जी कोरोना असलेल्या लोकांच्या संपर्कात आली पण त्यांना कोरोना झाले नाही. अशी देखील बरीच लोकं आहे ज्यांना कोरोना झाला पण ते 4 किंवा 7 दिवसात बरे देखील झाले. हा सर्व काही मनाचा खेळ आहे, आता आपण विचार कराल की मनाचा खेळ कसा काय ? चला तर मग जाणून घेऊया महत्त्वाच्या गोष्टी.
 
1 समजून घ्या : आपल्या मनाने आणि बुद्धीनेने असे मान्य केले की आपण आजारी आहोत तेव्हा आपल्याला आजार होणार नाही तरीही आपण मनाने आजारी होणार, कारण आपले मेंदू तेच काम करत ज्याला मनाने स्वीकार केलं जातं. मेंदू हा आपल्या शरीराचा एक भाग आहे आणि मन आपल्या सूक्ष्म शरीराचा एक भाग आहे. आपण अंगठ्याची हालचाल तेव्हाच करू शकतो जेव्हा मन आपल्या मेंदूच्या तंत्राला आज्ञा देतं. असे म्हणतात की 'मन के हारे हार है और मन के जीते जीत' म्हणून मनाच्या सामर्थ्याला जाणून घ्या.
 
2 भीती आणि काळजी : डॉ. असे मानतात की भीती आणि काळजीपोटी आपली रोग प्रतिकारक शक्ती बिघडून जाते. कोरोनाच्या काळात आपली प्रतिकारक शक्ती वाढवणे महत्त्वाचे असते. जर आपण काळजी आणि भीतीने वेढलेले असल्यास, प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीचे बूस्टर घेण्याचा देखील आपल्याला काहीच फायदा होणार नाही. ताण आपल्या आंतरिक शक्ती आणि आपल्या अंतरात्म्याला दडपतो. म्हणून याला समजून घ्या आणि या पासून लांब राहा. आपल्या मनाला मनोरंजन आणि नात्यांच्या संवादामध्ये गुंतवा.
 
3 प्राणायाम आणि ध्यान : आपल्या मनाची शक्ती वाढविण्यासाठीचे दोनच सोपे उपाय आहे पहिले नियमानं आपण प्राणायाम आणि ध्यान केले पाहिजे. ध्यान केल्यानं आपली गमावलेली ऊर्जा पुन्हा जमा होऊ लागते आणि त्याच वेळी अतिरिक्त ऊर्जा जमा होऊ लागते जी आपल्याला सर्व प्रकाराच्या रोग आणि शोक सहन करण्यासाठी मदत करते.

ध्यान अनावश्यक कल्पना आणि विचारांना मनातून काढून शुद्ध आणि निर्मळ शांततेत जाणं आहे. प्राणायाम आपल्या फुफ्फुसात आणि मेंदूत ऑक्सिजनची पातळी वाढवतं. भस्त्रिका प्राणायाम करावं. भस्त्रिकाचा अर्थ आहे 'भाता' म्हणजे एक असे प्राणायाम ज्यामध्ये लोहाराच्या भाताप्रमाणे आवाज करत वेगाने शुद्ध हवा आत नेतात आणि अशुद्ध हवा बाहेर काढतात. हे करण्यापूर्वी अनुलोम विलोम मध्ये दक्ष असावं नंतरच हे करावं.
 
4 शौच : योगाच्या शौच पद्धतीला अवलंबवा शौच म्हणजे शुद्धता, शुद्धी, शुद्धता, पावित्र्य किंवा पवित्रता आणि स्वच्छता. पावित्र्यात हे दोन प्रकाराच्या असतात. अंतर्गत आणि बाह्य. बाह्य किंवा शारीरिक शुद्धता देखील दोन प्रकाराच्या असतात. पहिली ती ज्या मध्ये शरीराला बाहेरून शुद्ध करतात. या मध्ये माती, उटणं, त्रिफळा, कडुलिंब लावून स्वच्छ पाण्याने स्नान करून त्वचेची आणि अंगाची शुद्धता करतात. दुसरे शरीराची अंतर्गत शुद्धता करण्यासाठीचे काही उपाय सांगितले आहेत. जसे की - शंख विरंजन (प्रक्षालन), नेती, नौली, धौती, गजकर्णी, गणेश क्रिया, अंग संचालन इत्यादी. अंतर्गत किंवा मानसिक शुद्धता मिळविण्याचे दोन मार्ग आहेत. पहिले मनाच्या भावना आणि विचारांना समजून घेणं. जसे की काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार यांचा त्याग केल्यानं मनाची शुद्धी होते. यामुळे चांगली वागणूक उद्भवते.
 
5 निर्भयता : गीता मध्ये सांगितले आहे. की जन्म आणि मरण माणसाच्या हातात नाही. भूतकाळ आणि भविष्यकाळ देखील आपल्या हातात नाही. आपल्या हाती आहे ते फक्त हे आयुष्य आणि वर्तमान. म्हणून जन्म आणि भूतकाळाचा दुःख करू नका आणि मृत्यू आणि भविष्याची काळजी करू नका. निर्भय होऊन फक्त कर्म करा. निस्वार्थ होऊन कर्म करा. आपले केलेले कर्मच आपले भविष्य आहे. 
 
6 विचार : माणूस आपल्या विचारांनीच घाबरतो आणि काळजीने आजारी पडतो. आज आपण जे आहोत ते आपल्या मागील केलेल्या विचारांमुळेच आहोत आणि उद्या जे घडणार ते आपल्या आजच्या विचारांचाच परिणाम असणार. शास्त्रज्ञ देखील हे मान्य करण्यास बाध्य झाले आहेत की कोणत्याही आजाराची सुरुवात आपल्या मनापासून होते. आपल्या मनात असंख्य विचारांची उलाढाल चालत असते. ज्यामध्ये बरेचशे विचार तर नकारात्मक असतात, पण हे नकारात्मक विचार कोणी ठरवून आणत नसतात ते आपसूकच येतात. पण सकारात्मक विचार आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

शास्त्रज्ञ सांगतात की माणसाच्या मेंदूत 24 तासात सुमारे 60 हजार विचार येतात. त्यापैकी बहुतेक विचार नकारात्मक असतात. नकारात्मक विचार अधिक असल्यास त्यांचा परिणाम आपल्या भविष्यावर तसाच पडणार. जर आपले मिश्रित विचार असतील तर आपले भविष्य देखील तसेच मिश्रीतच असणार. जे विचार सतत येतात तशीच धारणा बनून जाते. ब्रह्मानंदात या स्वरूपाचे चित्र फिरू लागतात आणि परत आपल्यापर्यंत येतात आणि आपल्या सभोवतालीचे घटनाक्रम तसेच घडू लागतात. त्या विचारवस्तू बनतात. म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे की आपण ज्या प्रकारे विचार करतो त्याच प्रमाणे भविष्यात घडत जातं. हीच गोष्ट 'दि सीक्रेट' मध्ये देखील सांगितली आहे. या संदर्भात जाणून घेऊ या स्वाध्याय, धारणा आणि ईश्वर प्रणिधानाच्या महत्वाला. 
 
7 झोप : पुरेशी झोप आणि व्यायाम आपल्या मेंदूलाच आणि मनाला देखील सामर्थ्यच देतं नाही तर प्रतिकारक क्षमतेला देखील वाढवतात. आपली झोप हे सर्वात मोठं डॉक्टर आहे. काळजी आणि भीती घेणाऱ्या माणसांची झोपच कमी होते. म्हणून जेव्हापण आपणास झोपण्याची संधी मिळतातच एक डुलकी घ्यावी. डुलकीमध्ये ते सामर्थ्य आहे जे 8 तासाच्या झोपेत देखील नाही.
 
8 अन्न : असे म्हणतात की जसे खाणार अन्न तसेच आपले बनणार मन. म्हणून असे आहार घ्यावे जे आपल्या शरीराला आणि मनाला आरोग्यवर्धक बनवतात. खाण्या-पिण्यातून मिळणाऱ्या आनंद,रस आणि आनंदाने परिपूर्णतेच्या भावनाने होऊन ग्रहण केल्यावर आनंद मिळेल. आयुर्वेदात लिहिले आहेत की अन्नाला प्रेमानं आणि आनंदाने ग्रहण केल्यावर विष देखील अमृतासारखे फायदे देतं. म्हणून चांगले आहार चांगल्या भावनांनी ग्रहण करा. जेवताना आपल्या मनाला कोणत्याही प्रकारे भरकटवू नका. अन्न घेताना त्याला पूर्ण सन्मान देऊनच त्याचा स्वीकार करावा. 
 
9 कोरोना व्हायरसला समजून घ्या : कोरोना व्हायरसला समजा. हा फार मोठा आजार नाही. ज्यांना हा आजार झाला तो बरा देखील झाला. आपल्या देशात या आजाराने मृत्युमुखी होणाऱ्यांची संख्या टक्केवारी फार कमी आहे. ज्यांनी भीती न बाळगता वेळेवर उपचार सुरू केले आणि ते बरे देखील झाले. कोरोनाच्या संसर्गात तेच लोकं येत आहे जे कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरणं करीत नाही. प्रश्न येतो तो डॉक्टर, नर्स, पॅथॉलॉजिस्ट,सफाई कामगार,पोलीस आणि इतर कोरोना व्हॅरियर्स चा तर ते इतरांची सेवा करताना संक्रमित झाले आहे आणि त्यापैकी काही बरे देखील झाले आहेत. म्हणून घाबरून जाऊ नका. दोन हात लांबच राहा,मास्क वापरा आणि वेळो-वेळी हात धुवावे. जर का आपण या नियमांचे पालन करीत असाल तर आपल्याला कधीही कोरोना होणार नाही आणि जर का आपण या नियमांना पाळत नसाल म्हणजे आपण देशाच्या विरुद्ध कार्य करीत आहात असे मानले जाणार. आज नाही तर उद्या ही वेळ सरूनच जाणार. जिंकणार तोच जो आपल्या मनाच्या सामर्थ्याला वाढवतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Army Public School मध्ये शिक्षकांच्या पदासाठी आठ हजार पदे रिक्त