Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लॉक डाऊन मध्ये आपली व्यायामाची पद्धत बदला या टिप्स अवलंबवा

लॉक डाऊन मध्ये आपली व्यायामाची पद्धत बदला या टिप्स अवलंबवा
, सोमवार, 17 मे 2021 (16:57 IST)
लॉकडाउन वाढला आहे आणि या विषाणूपासून मुक्त होण्यासाठी ही पद्धत देखील उत्तम आहे.कीआपल्या घरात बसणे. लॉकडाउन वाढल्यामुळे आपण आपल्या  प्रियजनांबरोबर घरी आणखी काही वेळ घालवू शकता आणि ही वेळ संस्मरणीय बनवू शकता. पण फिटनेसचं काय? फिटनेस कडे लक्ष देणं देखील महत्त्वाचे आहे. या साठी आम्ही आपल्याला काही टिप्स  सांगत आहोत. ज्यांना अवलंबवून आपण अधिकच फिट आणि सक्रिय व्हाल.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
* नृत्य -
स्वतःला फिट ठेवण्यासाठी आपण फक्त फ्लोरवरील व्यायाम करत होता, आता आपण व्यायामात काही बदल करू शकता. नृत्य करून देखील आपण स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता. या मुळे आपला मूड देखील चांगला राहील.  
 
* पाइक प्लैंक जंप-
या मध्ये आपल्याला डॉगी स्टाईल मध्ये यावे लागणार आणि पायांना झटका देत मागे घेऊन जायचे आहे नंतर झटका देऊनच त्याच स्थितीत आणायचे आहे. या मुळे आपल्या कंबरसह खांद्याच्या देखील व्यायाम होईल. 
 
* जंप लंग्स- 
हा व्यायाम आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. या मध्ये आपण एक पाय सरळ ठेवा आणि दुसरा पाय मागील बाजूस पंज्यावर ठेवा. आता हवेत उडी मारून पायाला बदला असं 2 मिनिटा पर्यंत करा. 
 
* जंपिंग जॅक -
हे व्यायाम केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. तसेच तणाव देखील कमी होत.हा व्यायाम करण्यासाठी, सर्वप्रथम उभे रहा. आता वरच्या दिशेने उडी घ्या आणि आपले हात देखील वर करा आणि त्याच बरोबर पाय देखील पसरवा. जेव्हा आपण खाली येता तेव्हा सामान्य स्थितीत परत या. हा व्यायाम 2 ते 3 मिनिटां पर्यंत पुन्हा करा. 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sainik School Recruitment 2021: सैनिक शाळेत दहावी उत्तीर्ण असणार्‍यांसाठी भरती