योग आपल्या शरीरास लवचिक आणि आरामदायी बनवितो. लवचिक शरीरामुळे शरीराला त्रास होत नाही. तणाव, थकवा आणि आळस योगामुळे लांब राहतात. योग केवळ शरीराच नव्हे तर मन आणि मेंदूचेही संतुलन राखते.
लवचिक शरीरात उर्जा कायम राहते. श्वास घेणे आणि सोडण्यात कोणतीही अडचण येत नाही. व्यक्तीमध्ये स्फूर्ती, जोश कायम रहातो. शरीरातील नको असलेली उर्जा बाहेर पडते. नेहमी ताजेतवाने वाटते.
आहार : सर्वप्रथम आपला आहार बदला. पाण्याचे जास्तीत जास्त सेवन करा. ताज्या फळांचा रस, ताक, कैरीचे पाणी, जलजीरा यासारख्या पेयांचे नेहमी सेवन करा. काकडी, टरबूज, डांगर, संत्रे, पुदिना यांचे भरपूर सेवन करा. मसालेदार आणि तेलयुक्त पदार्थांचा वापर टाळा.
योगासन : रोज नियमित सूर्यनमस्कार करा. कपालभारती आणि भस्त्रिका यांच्याबरोबर अनुलोम-विलोम करा. उभे राहून करण्यात येणार्या योगासनामध्ये त्रिकोणासन, कटीचक्रासन, ताडासन, अर्धचंद्रासन करा. तसेच उष्ट्रासन, अर्धमत्स्येंद्रासन, सिंहासन, समकोनासन, ब्रम्ह मुद्रा आणि भारद्वाजासनासारखे बसून करता येणारी आसनेही करा. भुजंगासन, धनुरासन आणि हलासन करणेही चांगले.
निवड : योगासनाची सुरवात कुठूनही करता येईल. पण सुरवातीला सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करा. त्यानंतर वरती दिलेल्या आसनांपैकी कमीत कमी तीन आसने नियमित करा. केवळ दोन महिन्यात तुम्हाला परिणाम दिसतील.
फायदा : योगासनामुळे तुमचे शरीर लवचिक राहीलच पण तुम्ही स्वस्थ आणि उर्जावान राहाल. म्हतारपण तुमच्यापासून खूप लांब राहील. पचनसंस्था चांगली राहणार असल्याने रोगापासून तुम्ही लांब राहाल. हात आणि पायात वेदना होणार नाही. शरीरातील चरबी कमी होऊन शरीर हलके-फुलके राहील.