Yoga Tips : योगाच्या 5 टिप्स अवलंबवा व्यायाम न करता आरोग्यदायी रहाल
, मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 (07:30 IST)
Helth Tips : व्यक्तीला स्वस्थ राहायचे असेल तर रोज कमीत कमी 15 मिनिट व्यायाम किंवा योगासन करणे गरजेचे असते. जर तुम्हाला वेळ नसेल तर आम्ही तुम्हाला आशा 5 टिप्स सांगू की व्यायाम व योगासन न करता तुम्ही आरोग्यदायी रहाल.
1. प्राणायाम करणे- प्राणायाम करतांना या तीन क्रिया करणे-1. पूरक, कुम्भक, रेचक. जर तुम्ही अनुलोम आणि विलोम हे नाड़ीशोधन प्राणायाम करत असाल तर तुमच्या संपूर्ण शरीराचा रक्त संचार सुचारु रुपाने चालत राहिल. यामुळे शरीरातील टॉक्सिन पण बाहेर येतात त्यामुळे व्यक्ति आरोग्यदायी रहातो. तुम्हाला फक्त पाच मिनिटांचा प्राणायाम करायचा आहे. हा तुम्ही ऑफिसच्या खुर्चीवर बसून पण करू शकतात.
2. योग मुद्रा- योग मुद्रा या अनेक प्रकारच्या असतात. यात हस्त मुद्रा ही मुख्य आहे. हाताच्या दहा बोटांनी विशेष आकृत्या बनवणे. ही हस्त मुद्रा होय. बोटांच्या पाच ही वर्गांमधून वेगवेगळ्या विद्युतधारा वाहत असतात. या करिता मुद्रा विज्ञानमध्ये जेव्हा बोट रोगानुसार आपसात प्रवेश करतात. तेव्हा थांबलेली असंतुलित विद्युतधारा वाहून शरीरातील शक्तीला पुन्हा जागृत करते आणि आपले शरीर निरोगी व्हायला लागते. अद्भुत मुद्रा करतांना ही आपला प्रभाव दाखवायला सुरुवात करते.
विशेषता वेगवेगळ्या मुद्रांनी वेगवेगळ्या रोगांपासून मुक्ति मिळते. मनात सकारात्मक उर्जेचा विकास होतो. शरीरात कुठेपण जर उर्जेचा अवरोध उत्पन्न होत असेल तर मुद्रांनी तो दूर होतो आणि शरीर हलके होते. ज्या हातांनी या मुद्रा बनवतात शरीरात उलट भागात याचा प्रभाव दिसायला सुरुवात होते.
मुख्यता दहा हस्त मुद्रा- हस्तमुद्रांमध्ये प्रमुख दहा मुद्रांचे महत्व आहे. 1.ज्ञान मुद्रा, 2.पृथ्वी मुद्रा, 3. वरुण मुद्रा, 4.वायु मुद्रा, 5.शून्य मुद्रा, 6.सूर्य मुद्रा, 7. प्राण मुद्रा, 8.अपान मुद्रा, 9.अपान वायु मुद्रा, 10.लिंग मुद्रा.
3. योग निद्रा- भ्रामरी प्राणायाम हे प्रतिदिन पाच मिनिट करणे. तुम्हाला इच्छा असेल तर 20 मिनिट योग निद्रा घेऊन त्या वेळस रुचकर संगीत पूर्ण तन्मयतेने ऐकणे. जर तुम्ही प्रत्येक दिवशी योग निद्रा करत असाल तर हा रामबाण उपाय सिद्ध होऊ शकतो. योगनिद्रामध्ये फक्त शवासन मध्ये झोपायचे आहे. आणि श्वास आणि प्रवाश वर लक्ष देणे. संपूर्ण शरीर पायापासून डोक्यापर्यंत क्रमाने हलके सोडून निवांत होणे.
4.ध्यान करणे- जर तुम्ही वरील काहीही करू शकत नसाल तर प्रतिदिन दहा मिनिट ध्यान करणे. हे तुमच्या शरीरासोबत मन आणि मेंदूला पण बदलवेल. हे हजार प्रकारच्या रोगांना नष्ट करतो. जर तुम्ही याला व्यवस्थित केले तर चांगले असते.
5.विरेचन क्रिया- यांत शरीरातील आतडयांना स्वच्छ केले जाते. आधुनिक युगात एनिमा लावून हे कार्य केले जाते. पण आयुर्वेदात प्राकृतिक प्रकारे हे कार्य केले जाते.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख