आजच्या धावपळीच्या जीवनात श्वास घेण्यासाठी लोकांजवळ वेळ नाही, मग योग आणि ध्यान केव्हा करतील? पण आपण 3 तास पिक्चर बघण्यात घालवतो, सिगारेट ओढण्यासाठी आणि कॉफी पिण्यासाठीसुद्धा 10 मिनिटे देतो. नेटवर चॅटिंगसाठी 1 तास देऊ शकतो! मग स्वत:च्या फिटनेससाठी 10 मिनिटे देण्यास काय हरकत आहे?
'रिफ्रेश योगा एक्सरसाइज' फक्त 10 मिनिटात करता येतो. हा फास्ट क्रिकेटसारखा योगाभ्यास आहे. योगातील काही टिप्स घेऊन युवकांसाठी हा योग साधण्यात आला आहे. डॉयनामिक 'रिफ्रेश योगा' पॅकेज हे त्याचे नाव.
काय आहे रिफ्रेश योगा? : रिफ्रेश योगा 'अंग संचलन आणि प्राणायामाचाच एक भाग आहे. हे केल्याने मेंदु शांत राहील आणि तुम्हाला आरोग्यदृष्ट्या चांगला अनुभव येईल. हे योगाच्या लहान लहान गोष्टींचे संक्षिप्त कलेक्शन आहे, आपण ते एरवीही करतो, परंतु, त्याला सुसुत्रपणे नियमित करण्याची गरज आहे.
रिफ्रेश योग्या करण्यापूर्वी : योगगुरू म्हणतात, की आम्हाला जेवढी भूक आहे त्यापेक्षा 2 पोळ्या कमी खाव्यात. तहान लागल्यावरच पाणी प्यावे. तुम्ही दिवसभर काय काम केले त्यावर तुमची झोप अवलंबून असते. कारण झोप डॉक्टर आणि औषधाचे काम करते.
कसा करावा रिफ्रेश योगा? : डोळे, जीभ, मनगट, कंबर तसेच मान उजवी आणि डावीकडे तसेच वर-खाली करत गोल गोल फिरवायला पाहिजे. हाताच्या मुठी खोला आणि बंद करा. त्याचप्रकारे पायांच्या बोटांनाही व्यायाम द्या. पूर्ण तोंड उघडून परत बंद करावे. उजव्या बाजूने डावा आणि डाव्या बाजूने उजव्या खांद्याला दाबावे.
मन आणि मेंदू : चिंता, दुःख किंवा मानसिक अशांतता आपल्या श्वसन क्रियेला अनियंत्रित करते. त्याने रक्ताची गतीसुद्धा असंतुलित होते. याचा सरळ प्रभाव हृदय, फुफ्फुस आणि पोटावर होतो. पुढे हे एखाद्या गंभीर रोगाचे कारणसुद्धा बनू शकते. याचा उपाय एकच आहे, जेव्हा जास्त तणावग्रस्त असता तेव्हा पोट आणि फुफ्फुसाचा पूर्ण वायू बाहेर काढून द्या. नवीन प्रकारे परत हवा भरावी. असे 5-6 वेळा करावे. हसण्याची संधी मिळते तेव्हा खदखदून हसावे.
रिफ्रेश योगाचे फायदे : हा व्यायाम संपूर्ण हात-पाय, सर्वाइकल स्पॉडोलाइटिस, खांदे आखडले असल्यास, सायटिका, डोळ्यांचे विकार, ताण-तणाव, डोकेदुखी, मानदुखी, कंबर, पाठदुखी, पोटाचे विकार, थकवा, रक्त कमतरता, आळस, गॅसेस इत्यादी रोगात फायदेशीर आहे.
योगा पॅकेज : भ्रमरी प्राणायाम फायदेशीर आहे. आंजनेय आसनही आरोग्यासाठी हितकारक आहे. 10 ते 40 मिनिट योगनिद्रा घ्यावी. फक्त 5 मिनिटासाठी हसावे व अंग संचलन नियमित करावे.