आनंददायी जीवनाचा 'योग' साधा!
, शुक्रवार, 16 सप्टेंबर 2011 (17:57 IST)
योगासन व प्राणायमाने शरीर व मन नेहमी ताजेतवाने ठेवता येते. योगासने नियमित केल्याने थकवा नाहीसा होऊन जीवनात आनंद आणता येतो. आसनाव्यतिरिक्त योगाचे इतर प्रकारही शरीराला लाभदायी ठरतात. सेक्स आधीच करा योगसेक्स करण्यापूर्वी योगासने केल्याने शरीरात भरपूर ऊर्जेचा संचार होत असतो. शरीरात निर्माण झालेली ऊर्जा सेक्स दरम्यान दोघांसाठी लाभदायी ठरत असते. योग केल्यानंतर स्नान करावे. त्यामुळे शरीर तसेच मन ताजेतवाने होते. प्रसन्न वाटते. बारा आसनांची जादूपद्मासन, अर्धमत्स्येंद्रासन, सर्वांगासन, हलासन, धनुरासन, पश्चिमोत्तनासन, मयुरासन, भद्रासन, मुद्रासन, भुजंगासन, चंद्रासन व शीर्षासन ही बारा आसने शरीर निरोगी राखण्यास मदत करतात. तारूण्य बहाल करतात. '
योगा' मसाजशरीर स्वस्थ ठेवण्यासाठी, थकवा दूर करण्यासाठी तेल अथवा चणाडाळीच्या पीठाने चेहर्याची मालिश करा. त्याचप्रमाणे अंघोळीच्या आधी डोके, पाय, खांदा, कान, पीठ, छाती व पोटाची मालिश करा. हळूवार शरीराचे सर्व अवयव दाबले पाहिजे. तसे केल्याने शरीरातील उर्जा कार्यान्वित होऊन ती प्रत्येक स्नायुंमध्ये संचारते. त्याने सतेज वाटते.
योगा स्नानसुगंध, स्पर्श, प्रकाश व तेल यांचे औषधीय मिश्रण सर्व प्रकारचे शारीरिक व मानसिक विकार दूर करत असतात. याला आयुर्वेदिक किंवा स्पा स्नान म्हटले जाते. या स्नानात अभ्यंग, शिरोधारा, नास्यम, स्वेदम व लेपन अशा प्रकारच्या अनेक पायर्या असतात. यापूर्वी आपण पंचकर्म चिकित्सेचाही वापर करू शकता. वमन, विरेचन, बस्ति-अनुवासन, बस्ति-आस्थापन व नस्य या पाच प्रकारे पंचकर्म चिकित्सामध्ये शरीराचे शुध्दीकरण केले जाते.यौगिक आहारयौगिक आहार शरीरासाठी आवश्यक आहे. खाण्याची व्यवस्थित पथ्ये पाळली नाहीत तर शरीर सुटते. अतिलठ्ठपणा अनेक समस्या निर्माण करतो. वात, पित्त व कफाने शरीराचे संतुलन बिघडते. लठ्ठपणावर नियंत्रण राखण्यासाठी यौगिक आहार घेणे लाभदायी असते. दररोजच्या आहारात साजुक तूप, रसयुक्त व तंतूमय पदार्थाचा समावेश असावा. भात, ज्वारी, दूध, लोणी, मध, हिरव्या पालेभाज्या, मूग, हरभरे व फळाचे सेवन करावे. क्षमतेपेक्षा कमी आहार घ्यावा. जादा मसालेदार पदार्थ टाळावेत. कडू, आंबट, तिखट, खारट, गरम, तेलकट, मद्य, मासे, मटण आदी गोष्टीचा त्याग करावा.