कपालभाती प्राणायामास हठयोगाच्या षट्कर्म क्रियांमध्ये स्थान आहे. (1. त्राटक 2. नेती. 3. कपालभाती 4. धौती 5. बस्ती 6. नौली.) योगशास्त्रातील काही प्राणायाम व ध्यान यांच्या तांत्रिक बाबी एकत्र करून आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्रीश्री रविशंकर यांनी सुदर्शन क्रिया व नव संन्यास, कम्यून कॉसेप्टचे प्रणेते ओशो यांनी सक्रिय ध्यानच्या विधी विकसित केल्या आहेत. आसनांमध्ये सूर्य नमस्कार व प्राणायामात कपालभाती तर ध्यानमध्ये विपश्यनेला महत्वपूर्ण स्थान आहे.
कपालभाती प्राणायामाला हठयोगात सहभागी करून घेण्यात आले असून प्राणायामात सगळ्यात फायदेशिर असे हे प्राणायाम मानले जाते. अतिवेगाने केली जाणारी ही रेचक प्रक्रिया आहे. आपल्या मस्तिष्कच्या पुढील भागाला कपाल व भाती या शब्दाचा अर्थ ज्योती असा आहे.
पध्दत- सिद्धासन, पद्मासन अथवा वज्रासनमध्ये बसून श्वास बाहेर सोडण्याची क्रिया करावी. श्वास बाहेर सोडताना आपल्या पोटावर अधिक जोर द्यायचा आहे. या क्रियेत श्वास घ्यायचा नसून तो जोरजोराने सोडायचा आहे. या क्रियेत श्वास हा आपोआप घेतला जात असतो.
फायदा- कपालभाती प्राणायाम केल्याने चेहर्यावरील सुरकुत्या नाहिशा होतात. डोळ्याखालील काळे वलय दूर होऊन चेहर्यावर तेज निर्माण होते. दात व केस संदर्भात सर्व प्रकारचे आजार दूर होत असतात. शरीरावरील अतिरिक्त चरबी नाहिशी होत असते. कफ, गॅस, एसिडिटीसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. शरीर व मनातील सर्व प्रकारचे नकारात्मक तत्व व विचार नष्ट होतात.