इंग्लंडमधील एका कालदर्शिकेने (कॅलेंडर) पशुप्रेमींचे लक्ष वेधले आहे. कालदर्शिकेवर कुत्र्यांना विविध मुद्रांमध्ये योगाभ्यास करताना दाखविले आहे. 'न्यू योगा डॉग्स 2010' असे या कालदर्शिकेचे नाव असून लंडनमध्ये याची पशुप्रेमींमध्ये एकच चर्चा सुरू आहे.
टेक्सासच्या डॅन व एलेजेंड्रा बोरिस यांनी कॉम्प्यूटरद्वारा ही कालदर्शिका तयार करण्यात आली आहे. त्यातील पृष्ठांवर विविध प्रजातीतील कुत्र्यांना योगा करतांना दाखविण्यात आले आहे.
'द टाइम्स'मध्ये झळकलेले वृत्त असे की, डॅनने यासंदर्भात एलेजेंड्राशी संपर्क साधला. माजी योगा शिक्षक एलेजेंड्राने कुत्र्यांना योगाच्या विविध अवस्थेत बसविले व डॅनने त्याची छायचित्र काढून पुढे त्याचा फोटोशॉपमध्ये विकास करून कालदर्शिकेच्या रूपात आपली कलाकृती जगासमोर सादर केली आहे.
'न्यू योगा डॉग्स 2010' तयार करताना मजेदार अनुभव असून पुढील वर्षी अर्थात 2011 चे कॅलेंडर तयार करण्यासाठी पपीची मदत घेणार असल्याचे डॅनने सांगितले.