Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जागृत करा सेक्स अ‍ॅनर्जी!

जागृत करा सेक्स अ‍ॅनर्जी!

वेबदुनिया

PR
WD
'भुवन ज्ञानम्‌ सूर्ये संयमात' सूर्य देवाला प्रसन्न केल्याने आपल्याला सौर ज्ञान उपलब्ध होत असते. सूर्य ऊर्जेचा केंद्रबिंदू म्हणजे आपली कामवासना होय. कामवासनाही सूर्य ऊर्जेद्वारा जागृत केली जाते आणि योगाभ्यातून आपल्या शरीरात सूर्य ऊर्जा उत्पन्न केली जात असते.

कामवासना जागृत झाल्याने आपण ऊष्ण व उत्तेजित होऊन जातो. आपल्या शरीरात उत्पन्न झालेली सूर्य उर्जा कामवासनेवर नियंत्रण ठेवत असून तिच्यामाध्यमातून आपल्याला सौर ज्ञानही प्राप्त होते आणि याच सौर ज्ञानाने आपल्यात सेक्स अ‍ॅनर्जी जागृत होत असते.

आपल्या शरीरात एक सूर्य स्वर व एक चंद्र स्वर असतात. कामक्रीडा झाल्यानंतर जेव्हा आपण थकतो तेव्हा आपल्यातील चंद्र स्वर सक्रिय होत असतो. त्यामुळे आपल्याला कामक्रीडा केल्यानंतर झोप लागत असते. सूर्य स्वर सक्रीय झाल्यानंतर आपण अधिक आक्रमक व उत्तेजित होत असतो.

तंत्र आणि योगशास्त्रानुसार आपली सेक्स ऊर्जा जर दिशा भरकटली असेल तर त्याचा परिणाम आपल्या चरित्रावर होत असतो. सेक्स ऊर्जेची दिशा आपल्या वैवाहिक जीवनावर अवलंबून असते. आपल्या शरीरातील सूर्य ऊर्जा जर कमकुवत असेल तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या सेक्स जीवनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सेक्स ऊर्जा कशी जागृत कराल?
काही जण लठठ असतात. अर्थात त्याचा परिणाम त्याच्या सेक्स जीवनावर होत असतो. त्यांना जेवन झाल्याझाल्या डुलकी येत असल्याने त्याच्यात कामवासनाप्रति अरुचि निर्माण होणे स्वाभाविक आहे. भरपेट भोजन केल्याने निर्मान झालेला आळस व सुस्ती ही कामोत्तेजनाच्या इच्छेसाठी मारक ठरत असते. यासाठी लठ्ठपणा कसा कमी होईल, यावरच अधिक भर दिला पाहिजे. योगसाधना करून आपण आपले वजन व लठ्ठपणा कमी करू शकतात.

काही जण शरीरयष्टीने प्रमाणापेक्षा जास्तच दुबळे असतात. आपल्यातील दुबळेपणा घालविण्यासाठी भरपूर पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. जास्त आहार घेण्यापेक्षा व्यायाम व योगाभ्यास करून आपले स्नायू बळकट केले पाहिजेत.

वरील दोन्ही प्रकारच्या समस्या असणार्‍यांनी योगतज्ञ्ज यांचे मार्गदर्शन घेऊन शरीर कशाप्रकारे कसले जाईल, याकडे लक्ष ‍दिले पाहिजे. नियमित सूर्य भेदन प्राणायाम, कुंडलिनी योग व योग मुद्रा केल्याने काही दिवसात आपल्या सेक्स जीवनावर त्याचा अनुकुल परिणाम जाणवेल. यात शंकाच नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi