'सूर्य नमस्कार' योगासनाची सुरवात प्रणाम मुद्राने होत असते. या मुद्रेतून अनेक प्रकारची आसने केली जातात. प्रणाम हे विनयशिलाचे सूचक आहे. यास नमस्कार अथवा नमस्ते असे ही म्हटले जाते. भारतीय संस्कृतीत यास फार महत्त्व आहे.
प्रणाम मुद्रा करण्याचे खूप फायदे आहेत. योगासन अथवा इतर कार्य करण्यापूर्वी प्रणाम केला जात असतो. हे केल्याने मन हलके होऊन मनात चांगले विचार येतात व कार्य यशस्वी होते.
पध्दत- दोनही हात जोडून जी स्थिती निर्माण होते, त्यास प्रणाम मुद्रा असे म्हटले जाते. सर्वप्रथम डोळे बंद करावे. नंतर दोनही हात एकत्र आणावे. अर्थात दोन्ही हात जोडून ते छातीच्या मध्यमागी टेकवावे व ताठ बसावे. त्यानंतर जोडलेले हात हळू-हूळू मस्तिष्कपर्यंत घेऊन जावे.
फायदा- स्नायू बळकट होतात. निद्रानाश, डोळ्यांची जळजळ बंद होते. हृदयचक्र व आज्ञाचक्र सक्रिय होते. मन:शांती लाभते. मनातून नकारात्मक विचार दूर होतात.