मानवी जीवनात योगाचे महत्त्व
''
शरीर माध्यम खलू द्यर्म साद्यनम्'' ही संस्कृत उक्ती अतिशय महत्त्वाची आहे. कोणतंही सत्कार्य (खलू-द्यर्म) साद्यायचं झालं तर ठणठणीत शरीर असल्याशिवाय त्या कार्याची फलश्रुती समाद्यानकारक मिळणे द्वरापास्त आहे. मनाचे स्वास्थ्य शरीरावर अवलंबून आहे, तर उलट पक्षी मनासह शरीराचे तंत्र सुरळीत राहते. मनाचा 'योग' कसा साद्यला जातो पहा; विनोबाजी लिहितात, खाटेवर रुग्ण द्वःखी कष्टी आहे, नर्सची ड्युटी संपलेली आहे. त्याच्या संपूर्ण व्यथा व औषद्यीचे तिला सातत्याने आकलन आहे. तिची वेळ झाली म्हणून ती घड्याळाकडे पाहून निघून जाणार व द्वसरी रुजू होणार. तो अत्यवस्थ रुग्ण पाहून तिने 'सेवाभावनेने दिलेला अद्यिकचा वेळ ही आंतरिक सेवेची पोचपावतीच नाही का? यालाच गीतेत कर्मタ विकर्मタ अकर्मタ'योग' असे म्हटले आहे. तुम्ही स्वतः आतून जोडून घ्या, मग 'मानसिक शांती' कुठे बाहेर शोद्यावी लागत नाही. योगात अष्टांग मार्ग यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, द्यारणा नि समाद्यी याला प्राद्यान्य दिले गेले. याने वर पाहिल्याप्रमाणे मानसिक स्वास्थ्य व सोबत जीवनात उठण्याबसण्याचे व खाण्यापिण्याचे नियम घालून घ्यावे लागतात. अन्यथा एकांगी स्वरूपाचे कार्य वा विचार होईल. गीतेत म्हटले आहे ''योगावरी चढू जाता शम साद्यन बोलिले'' शमचा अर्थ संयम.''न फार खावूनि किंवा खाणेचि सोडूनि, निजणे, जागणे, खाणे, फिरणे आणि कार्यही मोजूनि करितो त्यास योग हा दु: ख नाशन.'' अर्जुनाला दिलेला उपदेश सर्वांसाठी योगप्रेरक आहे.
एकदा आपण स्वतःला साद्यारण-सुलभ चाकोरीत बसवून घेतलं की योगाला पूरक अशी एवूत्ण शरीर-मनाची पार्श्चभूमी तयार होते. अर्थात तुम्ही जिथे राहता ते घर अंगण, परिसर, मित्र काया वाचा, पूजाविद्यी, पद्धती, चिंतन-मननाचे तुमचे विषय शरीरासाठी किती वेळ देता? जेवणासाठी, झोपण्यासाठी वेळ देतोच. व्यायाम-योग-आसन-प्राणायम याला विहित वेळ देणे गरजेचे आहे. पहेलवान खाल्लेले मुद्दाम मेहनतीने पचवतो व पुन्हा शरीरात कोंबतो. योग-साधक तसे करणार नाही. त्याला सम्यक आहार, सम्यक विहाराची चाड लागलेली असावी. त्याला आरोग्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नाही. तो सकाळ, सायंकाळ योगासाठी वेळ काढणार, नियंत्रित आसन व प्राणायाम करणार.''योग म्हणजे जोडणे'' हा विचार तो आपल्या जीवनात घेऊन निघाला की त्याला निसर्गाशी व नैसर्गिक सहजयोगाशी तो आपले सूत्र जुळविण्याचा प्रयत्न करतो. कारण ''योगः हा दु:ख नाशन'' निसर्गाच्या नियमाप्रमाणे जोडत राहिल्याने उफराटे विचार, आचार नि उच्चार होण्याचे कारण नाही.जीवनात सर्वांच्या हिताची 'समदृष्टी' यायला लागते.''सर्वांना सुख लाभावे तशी आरोग्यसंपदा, व्हावे कल्याण सर्वांचे, कोणी द्वःखी असू नये.'' ही सर्वात्मक निरामय-आरोग्याची भावना घेऊन तो धारणेवर चढतो. कुठलीही हानिहारक, हिंसक, असत्य बाब तो वर्ज्य करतो. तशी योग्याची वृत्ती प्राणायाम नि आसनातून स्थिरावते. आता योगाचा अर्थ सकाळी कुठेतरी जाऊन आसने नि प्राणायाम करण्यापुरता मर्यादित राहणार नाही. तो संपूर्ण 'जीवनरहाटीशी' निगडित झालेला असेल.निसर्गात चैतन्य शक्ती काम करते व हे जीवन सहजीवन आहे. यात वाटा संपूर्ण सजीव सृष्टी-चैतन्याचा आहे. ''जिवो जीवस्य जीवनम्'' असे हे परस्परावलंबी जीवन आहे. व्यक्ती ते समष्टीचा प्रवास हा परस्परांना एका अदृश्य साखळीत बांधतो.सत्यम्-शिवम्-सुंदरम् असं मंगलमय जीवन एकमेका साह्य करून जगण्यास सुसह्य केल्या गेले पाहिजे. सूर्य, चंद्र, तारे आपले नियोजित कार्य करतात. त्यांचा सातत्य-योग आम्ही डोळ्यासमोर आदर्श पाठ म्हणून ठेवला तर हे जीवन सुयोग्य होईल. 'आत्म-मोक्षार्थ' जगत हितायच' असा 'वसुद्यैव कुटुंबाचा' द्यागा जुळावा!