हिवाळा सुरू झाला असून प्रत्येकाला तब्बेत कमाविण्याचे वेध लागले आहे. शरीर चांगले कसावे म्हणून व्यायामावर भर देत असतात तर वयस्कर शरीर फिट राहावे म्हणून योगाभ्यास करताना दृष्टीस पडत असतात.
अलिकडच्या काळात 'मेडिकल योग' जनतेमध्ये लोकप्रिय झाला आहे. त्याचे महत्त्व नारिकांना चांगल्यापैकी कळले आहे. 'मेडिकल योग' मध्ये प्रचिन योगाभ्यास व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याचा दुहेरी लाभ मिळत असल्याने तो अल्पावधीतच जनतेत लोकप्रिय झाला आहे.
'मेडिकल योग' गुढघे दुखी, पाठ दुखी, मधुमेह अशा रुग्णांना अधिक फायदेशिर ठरला आहे. मेडिकल योग पध्दतीत एमआरआई, एक्स-रे, सीटीस्कॅन आदी चिकित्सा पध्दतीचा वापर करून त्यासाठी योगासनाची निवड केली जाते.
मेडिकल योगाचे राजधानी दिल्लीत तीन केंद्र स्थापन करण्यात आली असून देशभरात एकूण 23 केंद्र आहेत.
मेडिकल योग पध्दतीचा अवलंब करण्यासाठी योग बेंच, योग दोरी, खुर्ची व इतर फर्नीचरची आवश्यकता भासत असते. अस्थी वेदना, मधुमेह, मनक्यांचे आजारांवर मेडिकल योगच्या माध्यमातून उपचार केला जातो. वैद्यकिय चाचण्या झाल्यानंतर रुग्णाला फायदेशिर योगासन सांगितले जातात. 'मेडिकल योग' करून वजनही कमी करता येते. मेडिकल योग करताना एका तासात 3 ते 6 आसन केले जातात.
काही महिला- पुरुष हे पाय दुखीने त्रस्त असतात. वातावरणात होणारा बदल हे त्यामागील मुख्य कारण आहे. महिलांचे पाय हे स्वयंपाक घरात तासंतास उभे राहून काम करणे, उंच हिलच्या चपला वापरणे तर पुरूषांचे पाय ऑफिसात खुर्ची वर ताठ न बसणे, पाय लोंबकळत ठेवणे. अधिक गाडी चालवणे, बस किंवा लोकल गाड्यांमध्ये तासंतास उभे रहून प्रवास करणे तसेच वजनदार जोडे वापल्याने दुखत असतात. अशा महिला-पुरुषांसाठीही 'मेडिकल योग' वरदान ठरला आहे.