व्यक्तिमत्व विकासात उपयुक्तः ध्यान आणि योग
, मंगळवार, 1 मे 2012 (16:29 IST)
भारतीयांना परंपरेने मिळालेल्या योग आणि ध्यान या देणग्या किती उपयुक्त आहेत, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, यावर आता जगन्मान्यतेची मोहोर उमटली आहे. योग आणि ध्यान वैयक्तिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे अमेरिकेतील पेनिसिल्विनिया विद्यापीठाच्या संशोधकांना आढळले आहे. ध्यानाद्वारे मेंदूला तीन माध्यमातून कसे एकाग्रचित्त करता येते याचा शोध त्यांना लागला आहे. याशिवाय ध्यानात राहूनही मेंदूला क्रियाशील कसे ठेवता येते हेही त्यांना कळले आहे. यासाठी त्यांनी काही लोकांवर प्रयोग केले. त्यांना रोज महिनाभर तीस मिनिट ध्यान करावयास लावले. महिन्यानंर त्यांच्या मेंदूत घडलेल्या क्रियांचा अभ्यास केला. त्यांच्या मानसिक स्थितीचाही आढावा घेण्यात आला. ध्यानामुळे या लोकांमध्ये सकारात्मक परिवर्तन घ़डल्याचे त्यांच्या लक्षात आले. या अभ्यासाचा सविस्तर निष्कर्ष कॉग्निटिव्ह इफेक्टस एंड बिहेवियरल न्यूरोसायंस या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.