सूर्य मुद्रा आमच्या शरीरातील अग्नी तत्त्वाला संचलित करतो. सूर्य बोट म्हणजे अनामिका त्याला रिंग फिंगर म्हणतात. या बोटाचा संबंध सूर्य आणि युरेनस ग्रहाशी आहे. सूर्य ऊर्जा आरोग्याचे प्रतिनिधित्व करून अंतर्ज्ञान आणि बदलाचा प्रतीक आहे.
विधी : सूर्य बोटाला तळहाताकडे मोडून त्याला अंगठ्याने दाबावे. बाकी उरलेले तिन्ही बोटं सरळ ठेवावे. याला सूर्य मुद्रा म्हणतात.
लाभ : ही मुद्रा रोज दोन वेळा 5 ते 15 मिनिट केल्याने शरीरातील कोलेस्टरॉल कमी होतं. वजन कमी करण्यासाठी या मुद्रेचा प्रयोग केला जातो. पोटाशी निगडित रोगांमध्ये ही मुद्रा लाभदायक आहे. अस्वस्थपणा आणि काळजी कमी होऊन डोकं शांत राहण्यास मदत मिळते. ह्या मुद्रेमुळे शरीरातील चरबी करून शरीराला हलके बनवते.